लालबागचा राजाच्‍या मंडपात भाविक आणि पदाधिकारी यांमध्‍ये हाणामारी !

शहरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मंडपात पदाधिकारी आणि भाविक यांमध्‍ये हाणामारी झाल्‍याची दुर्दैवी घटना घडली.

मावळच्‍या (पुणे) शिळिंब गावातील भात शेतीतून श्री गणेशाची प्रदक्षिणा !

१०० वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही शिळिंब गावाने जपली असल्‍याचे पहावयास मिळत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या कालावधीत अधिकचे बसभाडे घेणार्‍या १८ खासगी बसगाड्यांवर कारवाई !

जनतेच्या समस्यांविषयी संवेदनशीलता दाखवून खासगी बसमालकांवर कारवाई करणार्‍या परिवहन विभागाचे अभिनंदन !

डफळापूर (जिल्‍हा सांगली) येथील मूर्तीविक्रेत्‍यांकडून दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक भेट !

येथील मूर्तीविक्रेते श्री. रोहित वाठारे आणि श्री. आशिष मोहिते यांनी हिंदु, तसेच गणेशभक्‍तांना शास्‍त्र समजावे; म्‍हणून दैनिक ‘सनातन प्रभात’चा श्री गणेशचतुर्थी विशेषांक प्रत्‍येक मूर्तीसमवेत भेट दिला. त्‍यांनी ४५० अंकांचे वितरण केले.

गणेशोत्‍सवाच्‍या काळात महापालिकेच्‍या रुग्‍णालयांमध्‍ये विनामूल्‍य औषधोपचार मिळणार !

गणेशोत्‍सवाच्‍या पार्श्‍वभूमीवर आरोग्‍य विभाग, सर्व क्षेत्रीय कार्यालये, अग्‍नीशमनदल, विद्युत् विभाग आणि महापालिकेचा घनकचरा व्‍यवस्‍थापन विभाग या सर्वांनी कामकाजाचे नियोजन केले आहे.

भोर (पुणे) येथील गणेशोत्‍सवाला ‘शिवकालीन’ ३०० वर्षांची परंपरा !

येथील शिवापुरी आळीतील फडणीस वाड्यामध्‍ये ‘शिवकालीन’ काळापासून ‘गणेशजन्‍म सोहळ्‍या’ची परंपरा आजही राखली जाते. सुमारे ३०० वर्षांपूर्वीची ही परंपरा फडणीसांची १८ वी पिढी पारंपरिक पद्धतीने साजरी करते.

Ganeshotsav : सार्वजनिक गणेशोत्‍सवाचे पालटते स्‍वरूप आणि योग्‍य दिशा !

आपल्‍या संस्‍कृतीला शोभतील, अशाच स्‍वरूपात उत्‍सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत किंवा अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सण, उत्‍सव हे सर्वच आपल्‍या हिंदु संस्‍कृतीचा ठेवा आहेत.

मुंबईत ‘वेफर्स’पासून बनवली श्री गणेशमूर्ती !

देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्‍याला आणि दर्शन घेणार्‍यांना दोघांनाही लाभ होईल का ?

विसर्जनासाठी वरिष्‍ठ पातळीवरून येणार्‍या आदेशांचे पालन करावे लागते ! – पोलीस अधीक्षक

बळजोरी पुढील दिवसांमध्‍ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांवर करू नये, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली.

पालघर येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना ३ जणांचा बुडून मृत्‍यू !

वाडा तालुक्‍यातील कोणसई गावात ओहळावर आस्‍थापनातील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना जगन मौर्य (वय ३८ वर्षे) आणि सुरज प्रजापति (वय २५ वर्षे) या परप्रांतियांचा बुडून मृत्‍यू झाला.