विसर्जनासाठी वरिष्‍ठ पातळीवरून येणार्‍या आदेशांचे पालन करावे लागते ! – पोलीस अधीक्षक

प्रतिकात्मक चित्र

कोल्‍हापूर – दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ज्‍याप्रकारे पोलीस प्रशासनाकडून भाविकांवर पंचगंगेच्‍या काठी विसर्जन करू न देण्‍यासाठी बळजोरी करण्‍यात आली, तशी बळजोरी पुढील दिवसांमध्‍ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांवर करू नये, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली. पोलीस अधीक्षकांनी मात्र ‘विसर्जनासाठी वरिष्‍ठ पातळीवरून येणार्‍या आदेशांचे पालन करावे लागते’, असे सांगून हतबलता व्‍यक्‍त केली.

या प्रसंगी बजरंग दलाचे जिल्‍हा संयोजक श्री. पराग फडणीस, हिंदु महासभेचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. मनोहर सोरप, श्री. राजू तोरस्‍कर, श्री. नंदकुमार घोरपडे, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. दीपक देसाई आणि हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे उपस्थित होते.