मुंबई – शहरातील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपात पदाधिकारी आणि भाविक यांमध्ये हाणामारी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. २२ सप्टेंबर या दिवशी सकाळी हा प्रकार घडला असून या ठिकाणी होणारी भाविकांची मोठी गर्दी आणि त्या दृष्टीने गर्दीचे व्यवस्थापन याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मागील काही वर्षांपासून लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. २१ सप्टेंबर या दिवशी या मंडपामध्ये भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. सुदैवाने या वेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र असे प्रकार घडू नयेत, यासाठी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
सौजन्य एबीपी माझा