श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नका !

पन्‍हाळा तालुक्‍यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नये; म्‍हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्‍णु चव्‍हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्‍यात आले.

हिंदुत्‍वनिष्‍ठांच्‍या आवाहनाला प्रतिसाद देत भाविकांचे शास्‍त्रानुसार पंचगंगा नदीत दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

यंदा प्रशासनाने नदीकाठी छोटी कृत्रिम कुंड बसवली होती, तसेच मूर्तीदान ऐच्छिक ठेवले होते. भाविकांनी मात्र पंचगंगा नदीत विसर्जन करण्‍यासच पसंती दर्शवली. मूर्तीदानही अत्‍यल्‍प प्रमाणात झाले.

पिंपरी-चिंचवड विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्‍णवाहिका सज्‍ज !

शास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन हे पर्यावरणपूरकच आहे.

कृत्रिम हौदात गढूळ पाणी आणि कचरा असल्‍याने श्री गणेशमूर्ती घेऊन घरी परतण्‍याची भाविकांवर वेळ !

महापालिका प्रशासन आणखी किती वेळा अशा पद्धतीने गणेशाचा अवमान करणार आहे ? याविषयी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्‍यावर कठोर कारवाई करायला हवी. नदीला मुबलक पाणी असल्‍याने वहात्‍या पाण्‍यात गणेशमूर्तींचे विसर्जन केले, तर शास्‍त्राला धरून कृती होईल.

मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौद बांधून तेथेच विसर्जन करण्‍याचा अट्टहास !

धर्मशास्‍त्राप्रमाणे वहात्‍या पाण्‍यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करणे हे योग्‍य असतांना कृत्रिम हौद आणि मूर्तीदान मोहीम राबवून महापालिका अन् काही स्‍वयंसेवी संघटना धर्मद्रोही कृत्‍य करत आहेत. याला भक्‍तांनी संघटित होऊन वैध मार्गाने विरोध करावा.

सोलापूर येथे हलालमुक्‍त गणेशोत्‍सव साजरा होण्‍यासाठी प्रयत्न करणार !

हिंदूंच्‍या कष्‍टाचा पैसा ‘हलाल प्रमाणपत्रा’च्‍या माध्‍यमातून आतंकवाद्यांसाठी वापरला जात आहे. त्‍यामुळे हलाल प्रमाणित वस्‍तू खरेदी करू नयेत, यासाठी शहरातील प्रत्‍येक हिंदु कुटुंबाची जनजागृती करण्‍याचा निर्धार येथील पुरोहितांनी संघटितपणे केला.

शास्‍त्रीय पद्धतीने आदर्श गणेशोत्‍सव करणारी मिरज येथील विद्या मंदिर प्रशाला ! 

मिरज येथील विद्या मंदिर प्रशालेत गेली काही वर्षे शास्‍त्रीय पद्धतीने आणि पर्यावरणपूरक गणेशोत्‍सव साजरा केला जातो. शाळेतील शिक्षिका सौ. श्‍वेता सुनील वसगडे आणि विद्यार्थी यांनी शाडू मातीची श्री गणेशमूर्ती सिद्ध केली आहे, तसेच बाजूची सजावट नैसर्गिकरित्‍या सिद्ध करण्‍यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे ३०० विद्यार्थ्‍यांनी बनवल्‍या ‘इको फ्रेंडली’ श्री गणेशमूर्ती !

शहरातील ‘साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या नरसिंहपूर साधना पाटील प्राथमिक विद्यालय आणि शहरातील साने गुरुजी माध्‍यमिक विद्यालय येथे ‘इको फ्रेंडली बाप्‍पा बनवा’ (पर्यावरणपूरक) या कार्यशाळा आणि कार्यशाळेत बनवलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे प्रदर्शन नुकतेच त्‍या-त्‍या शाळेच्‍या प्रांगणात पार पडले.

राज्‍यभरात दीड दिवसांच्‍या श्री गणेशमूर्तींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन !

राज्‍यभरात दीड दिवसांच्‍या आणि प्रामुख्‍याने घरगुती श्री गणेशमूर्तींचे २० सप्‍टेंबरला ‘गणपति बाप्‍पा मोरया-पुढच्‍या वर्षी लवकर या’, ‘गणपति गेले गावाला चैन पडेना आम्‍हाला’, या गजरात भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्‍यात आले.

श्री गणरायाला साकडे !

देवा श्री गणेशा, तू गणांचा अधिपती आहेस ! तू दुःखहर्ता आहे आणि सुखकर्ता आहेस. पूजेत तुला पहिला मान आहे; कारण तुझ्‍या स्‍मरणमात्रे दाही दिशा मोकळ्‍या होतात आणि पूजेतील ती ती देवता पूजेच्‍या ठिकाणी येऊ शकते !