Assam Flood Jihad : मुसलमानांकडून आसाममध्ये केला जात आहे ‘पूर जिहाद’ !
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा
आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा
मुळा आणि पवना या नद्यांना पूर आल्यानंतर नदीकाठच्या रहिवाशांना प्रतिवर्षी स्थलांतरित व्हावे लागते. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा पर्याय काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले.
पुणे परिसरातील खडकवासला, मुळशी, पवना इत्यादी धरणांतून पाण्याचा विसर्ग चालू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या धरण आणि नदी परिसरांतील पूररेषेच्या आतील आणि संभाव्य धोका क्षेत्रातील नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात यावे.
मावळ तालुक्यात गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे तालुक्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे.
पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत अनुमाने १०० सैनिकांचा समावेश आहे. ही सैन्याची तुकडी आल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासह प्राथमिक पहाणी केली.
आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंपदा विभाग आणि ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हे यासाठी एकत्रितरित्या काम करणार आहेत.
जिल्ह्यात नुकत्याच उद्भवलेल्या पूरस्थितीत कर्तव्य बजावलेले प्रसार माध्यमांतील पत्रकार आणि छायाचित्रकार यांच्या आरोग्य पडताळणीसाठी ‘डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन’च्या विशेष सहकार्याने ‘कोल्हापूर प्रेस क्लब’ येथे आरोग्य शिबिर पार पडले.
कोयना परिसरात पावसाचा जोर वाढल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसाची चेतावणी आणि वाढीव विसर्ग यांमुळे सांगली येथे पुन्हा पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विश्व हिंदु परिषद-बजरंग दलाचे नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या इचलकरंजी येथील नागरिकांसाठी सेवाकार्य करण्यात येत आहे. पूरस्थितीमुळे स्थलांतरित झालेल्या नागरिकांना अन्न मिळण्यासाठी ‘केंद्रीय भोजनकक्ष’ चालू करण्यात आला आहे.
बस्तवाड-आकीवाट मार्गावर ट्रॅक्टरमधून ७ जण नदीच्या पुलावर आलेअसता पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ट्रॅक्टर वाहून जाऊ लागला. ट्रॅक्टरचालकाचा ताबा सुटल्याने तो नदीपात्रात उलटला.