Pune Rain Prediction : जुलै महिन्यात पूर आणि अतीवृष्टी यांमुळे मोठी हानी झाली !
ज्योतिष शास्त्राला थोतांड म्हणणार्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
ज्योतिष शास्त्राला थोतांड म्हणणार्या तथाकथित बुद्धीप्रामाण्यवाद्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’ (धोकादायक परिस्थितीची चेतावणी) दिला आहे.
उत्तराखंडमधील जोशीमठ येथे भूस्खलनामुळे बंद झालेला बद्रीनाथ महामार्ग ८३ तासांनंतर खुला झाला आहे. चार धाम यात्रेतील भाविक मोठ्या संख्येने अडकून पडले होते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात सातत्याने होणार्या पावसाने पंचगंगा नदीची पाणीपातळी ३३ फूट ५ इंच इतकी नोंदवली गेली असून तिची वाटचाल आता ३९ फूट या इशारा (पाणी अधिक वाढल्याचे संकेत) पातळीकडे चालू आहे.
महापालिका प्रशासनाने विकासाच्या नावाखाली सिद्ध केलेले अशास्त्रीय रस्ते, खड्डे टाळण्यासाठी गल्ली-बोळांमध्ये बांधलेले सिमेंट-काँक्रीटचे रस्ते आणि पाण्याचा निचरा करणार्या सांडपाणी वाहिन्यांचे ढिसाळ नियोजन हे पुणे शहर ‘जलमय’ होण्यास कारणीभूत ठरत आहेत.
कृष्णा खोर्यातील महापूर रोखण्यासाठी अलमट्टी धरण आणि हिप्परगी बंधार्यामधील (बॅरेज) पाण्याची पातळी नियमानुसार ठेवण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन अलमट्टी धरण प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता रमणगोंडा हुन्नूर आणि त्यांचे सहकारी अभियंते यांनी दिले.
केरळमध्ये ३ दिवसांपूर्वीच मोसमी पावसाचे आगमन झाले आहे. येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने राज्यातील अनेक भागांत भूस्खलन झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून सखल भागांत पाणीही साचले आहे.
संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेची सर्व यंत्रणा सज्ज झाली असून २७ मे या दिवशी पावसाळ्यापूर्वी अग्नीशमन विभागाकडून अग्नीशमन, शोध आणि बचाव कार्य यांची प्रात्याक्षिके पंचगंगा नदीघाट येथे सादर करण्यात आली.
आतापर्यंत महाविद्यालयातील विद्यार्थी, ‘कॉर्पोरेट’मधील नोकरदार यांना सगळीकडे एक आदर्श ‘केस स्टडी’ (अध्ययनासाठी) म्हणून ‘दुबईची प्रगती कशी झाली ?’, याचे धडे दिले जायचे; पण आता या पुराच्या प्रसंगातून आपण काही शिकणार आहोत कि नाही ? हे महत्वाचे आहे.