नदीकाठच्या गावांना सावधानतेची चेतावणी !
वडगाव मावळ (जिल्हा पुणे) – मावळ तालुक्यात गेल्या ३-४ दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढल्यामुळे तालुक्यातील सर्वच धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नद्यांना पूर आला आहे. संततधार पावसामुळे तालुक्यातील सर्व धरणे यापूर्वीच भरली आहेत. पावसाच्या प्रमाणानुसार आणि धरणात येणारी पाण्याची आवक लक्षात घेता पाण्याचा विसर्ग अल्प-अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. तालुक्यातील पवना धरण, वडिवळे धरण, आंद्रा धरण आणि जाधववाडी धरण येथून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. धरणांतून होणार्या विसर्गांमुळे इंद्रायणी आणि पवना या नद्यांच्या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या लोकांना सावधानतेची चेतावणी देण्यात आली आहे.