आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा
गौहत्ती (आसाम) – आसाममध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्याच्या संदर्भात मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी या पुरामागे ‘पूर जिहाद’ असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले की, ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, मेघालया’च्या (यू.एस्.टी.एम्.च्या) मालकांनी आसामविरोधात ‘पूर जिहाद’ चालू केला आहे. आपण भूमी जिहादविषयी (लँड जिहाद) बोलतोे; मात्र बहुबुबूल हक (विद्यापिठाचे मालक) यांनी आसामच्या विरोधात पूर जिहाद छेडला आहे. त्यामुळेच त्यांनी डोंगराळ भागातील झाडे कापली. या कृतीला जिहादच म्हणावे लागेल; कारण ते जाणूनबुजून केलेले कृत्य आहे, असे मला वाटते. अन्यथा ते वृक्षतोड न करता, डोंगर न पोखरता इमारत बांधू शकले असते, मल:निस्सारणाची व्यवस्था करू शकले असते; मात्र त्यांनी कोणतीही माहिती न घेता, भविष्यातील धोक्यांचा विचार न करता बुलडोझरचा वापर करून झाडे भुईसपाट केली, डोंगर पोखरले.
मुख्यमंत्री सरमा यांनी यापूर्वी बंगाली मुसलमान शेतकर्यांवर ‘खत जिहाद’चा आरोप केला होता. सरमा म्हणाले होते की, मुसलमान शेतकरी अधिकाधिक अन्नधान्य, भाज्या पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करत आहेत. ते अन्न खाऊन लोक आजारी पडत आहेत.