शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (वय ५२ वर्षे) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट या दिवशी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले.
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (वय ५२ वर्षे) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट या दिवशी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले.
गड-दुर्गांवर अनुचित प्रकार, विद्रुपीकरण होणे, वणवे लावले जाणे असे प्रकार घडत आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने गांभीर्याने लक्ष घालून ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेकापकडून करण्यात आली आहे.
मंत्रीमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात स्थान न मिळाल्यामुळे आमदार बच्चू कडू यांनी १० ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली.
या वेळी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘मागील २ मासांत राज्यात अतीवृष्टीमुळे शेतकर्यांची मोठी हानी झाली आहे. हे आर्थिक साहाय्य ३ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळामध्ये आणखी १८ मंत्र्यांचा समावेश झाला आहे. ९ ऑगस्ट या दिवशी राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नवीन सरकारमधील १८ आमदारांना मंत्रीपद आणि गोपनीयता यांची शपथ दिली.
महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रीमंडळाचा विस्तार ९ ऑगस्ट या दिवशी होणार आहे. सकाळी ११ वाजता राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मंत्र्यांना पद आणि गोपनीयता यांची शपथ देणार आहेत.
मंत्रीमंडळाचा विस्तार होत राहील आणि सत्ताधारीही पालटत रहातील; परंतु ज्या वेळी सत्ताधार्यांना ‘आम्ही जनतेशी बांधील आहोत’, याची जाणिव होईल, तेव्हा खर्या अर्थाने लोकशाही ‘सुजलाम् सुफलाम्’ असेल !
‘यापुढे असे कृत्य कुणी करू धजावणार नाही’, असे कठोर शासन आरोपींना करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पोलिसांना आदेश
नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ ऑगस्ट या दिवशी तातडीने देहली येथे गेले. राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी ते घेतील, अशी शक्यता आहे.
सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. केंद्र सरकारच्या वतीने आतापर्यंत तामिळ, संस्कृत, कन्नड, तेलगू, मल्याळम् आणि उडिया या भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे.