‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? – एकनाथ शिंदे

ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, ते ‘वन्दे मातरम्’ म्हणत हसतहसत फासावर गेले. ‘वन्दे मातरम्’ बोलू नका’, असे इंग्रज म्हणायचे. ‘वन्दे मातरम्’ म्हणू नका सांगणारे तुम्ही इंग्रजांच्या बाजूचे आहात का ? असा सडेतोड प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्याचे कंत्राट घेतले आहे !

महाराष्ट्राचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. उत्तम विरोधक बनून सहकार्य करावे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी ही राज्याची २ चाके आहेत. राज्याच्या हितासाठी दोघांनी एकत्र काम करणे आवश्यक आहे.

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कृती आराखडा सिद्ध करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आत्महत्या करणार्‍यांचा नव्हे, तर हा लढवय्यांचा महाराष्ट्र आहे. येथील शेतकरी केवळ महाराष्ट्राची नाही, तर देशाची भूक भागवतो. झाडाला लटकवण्याइतका तुमचा जीव स्वस्त नाही.

धर्मांतरविरोधी कायदा करणे आणि गड-दुर्गांवरील अतिक्रमण हटवणे, यांविषयी बैठक आयोजित करू ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू करावा, तसेच गड-दुर्ग यांचे संवर्धन करावे या मागण्यांसाठी समितीच्या शिष्टमंडळाने २२ ऑगस्ट या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना या विषयांची निवेदने दिली.

वन विभाग आणि सातारा जिल्हा प्रशासन यांची तातडीने बैठक आयोजित करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश

अफझलखानाचे उदात्तीकरण रोखून आतंकवाद निर्मूलनाचे उदाहरण देणारे ठिकाण सर्वांसाठी खुले करावे !

नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे.

राज्यात दहीहंडी उत्साहात साजरी !

आम्ही दीड मासापूर्वीच बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने ‘हंडी फोडली’ ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘हे सर्वसामान्यांचे सरकार आहे’, अशी जनभावना आहे ! – मुख्यमंत्री

खंबीरपणे उभे राहून ४० दिवसांत ७५० निर्णय घेतल्याचे प्रतिपादन !

कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी मंत्रालयात बैठक घेणार ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी घेतला जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा

खातेवाटप घोषित, मुख्यमंत्र्यांकडे १४, तर उपमुख्यमंत्र्यांकडे ८ खात्यांचे दायित्व !

महाराष्ट्रातील राज्यशासनाचे खातेवाटप १४ ऑगस्ट या दिवशी घोषित करण्यात आले. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे १४, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ८ खात्यांचे दायित्व असणार आहे.