मुंबई – नियोजित कार्यक्रम रहित करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४ ऑगस्ट या दिवशी तातडीने देहली येथे गेले. राज्यातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराविषयी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी ते घेतील, अशी शक्यता आहे.
शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांना अपात्र करावे, यासाठी उद्धव ठाकरे यांच्या गटाने केलेल्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वाेच्च न्यायालयाने हे प्रकरण घटनापिठाकडे देण्याविषयी ८ ऑगस्ट या दिवशी निर्णय घेण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. घटनापिठाची स्थापना झाल्यावर न्यायालयीन प्रक्रिया आणखी वाढण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयापर्यंत राज्यातील मंत्रीमंडळाचा विस्तार लांबवणे हे राज्य सरकारसाठी अडचणीचे ठरणारे आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशनही लांबले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीत पक्षश्रेष्ठींशी धोरणात्मक चर्चा होण्याची शक्यता आहे.