मंत्र्यांच्या आगमनासाठी पनवेल महानगरपालिकेकडून एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध !

केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कोपरा गावासमोर एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध केला. या रस्त्याचे काम १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित होते.

कराड येथील यशवंतराव चव्हाण समाधी स्मारकाजवळील अवैध मजार हटवा !

महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.

श्री तुळजाभवानी मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या दोषींवर कारवाई करावी !

मंदिराच्या देवधनाचा अपवापर करणारे आणि भाविकांना दर्शनापासून वंचित ठेवणारे यांवर देवीची अवकृपा नाही का होणार ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देणार्‍याला अटक !

१० एप्रिलला रात्री ‘११२’ या ‘हेल्पलाईन’ क्रमांकावर दूरभाष करून ‘मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे’, अशी धमकी देण्यात आली होती.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम लवकरच महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोचणार !

महाराष्ट्रातील घराघरात लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महती पोचवण्याचा स्तुत्य निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी राज्यशासन लवकरच ‘हर घर सावरकर’ अभियान हाती घेणार आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिलला रात्री लक्ष्मणपुरी येथील शासकीय निवासस्थानी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली.

राजकीय दुकान बंद होण्याच्या भीतीने काहींचा हिंदुत्वाला विरोध ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमच्या अयोध्या दौर्‍याचा काहींना त्रास झाला; कारण त्यांना हिंदुत्वाची ‘अ‍ॅलर्जी’ आहे. हे लोक हिंदु धर्माविषयी चुकीचा प्रचार करत होते. त्यांना वाटते की, हिंदुत्व सर्वांच्या घरात आणि मनात पोचले, तर त्यांची राजकीय दुकाने बंद होतील.

एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त !

राज्यात नवीन सरकार स्थापन होऊन ९ मास झाले, तरी अद्याप एस्.टी. महामंडळाच्या संकेतस्थळावर परिवहनमंत्र्यांची जागा रिक्त आहे. परिवहनमंत्री हे एस्.टी. महामंडळाचे अध्यक्ष असतात. परिवहन खात्याचा कारभार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

देशातील हिंदू आता जागृत झाला आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई आणि ठाणे येथे २ एप्रिल या दिवशी गौरव यात्रा काढण्यात आली. दादर येथे उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात बोलणार्‍यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी यात्रेचे आयोजन ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती, राष्ट्रभक्ती आणि प्रखर हिंदुत्ववाद, म्हणजे प्रत्येक देशवासियासाठी अभिमानाची गोष्ट आहे.