हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे मागणी
(मजार म्हणजे मुसलमान फकिराचे थडगे)
सातारा – येथील कराड येथे भक्तीभावाचे प्रतीक असलेल्या कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमाजवळ महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे समाधी स्मारक उभारले आहे. प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या संगमाच्या मागील बाजूस हजरत जाफर अली बाबा या नावाने अवैध मजार बांधण्यात आली आहे.
आता ‘गूगल मॅप’वरही या मजारीचे ठिकाण (लोकेशन) दाखवले जात आहे. असे असूनही प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे. हे अतिशय संतापजनक आहे. शासनाने आतातरी तातडीने ही अवैध मजार हटवावी, तसेच या अवैध बांधकामाला उत्तरदायी असलेल्या प्रशासकीय अधिकार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
कराड येथे कृष्णा-कोयनेच्या संगमाजवळ व मा.'यशवंतराव चव्हाण‘यांच्या समाधी स्मारका' जवळ हजरत जाफर अली बाबाची मजार बांधली आहे.@CMOMaharashtra व @Dev_Fadnavis जी ही अनधिकृत मजार तातडीने काढून टाकून यात दुर्लक्ष करणाऱऱ्या संबधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी ही मागणी आहे@SMungantiwar pic.twitter.com/2MvYkJujth
— Sunil Ghanwat (@SG_HJS) April 14, 2023
हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना दिलेले निवेदन –
या निवेदनात म्हटले आहे की,
१. महाराष्ट्रात आज अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या अवैध मजारी, दर्गे, पीर उभे राहिल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारे मजारी बांधून जागा बळकावणे, हा एक प्रकारे ‘लँड जिहाद’च आहे.
२. ही मजार या प्रीतीसंगमाच्या मागच्याच बाजूस असल्याने या पर्यटनाचे आकर्षण असणार्या स्मारकाच्या सौंदर्यास गालबोट लागले आहे.
३. शासनाने कराड नगरपालिकेस ही मजार तात्काळ हटवण्याचा आदेश द्यावा शासन आणि प्रशासन यांनी समयमर्यादेत ही कारवाई करावी आणि अवैध मजार त्वरित हटवावी. यासह या अवैध दर्ग्याची गूगल मॅपवरील नोंद रहित होण्यासाठीही योग्य ती कारवाई करावी.