|
नवी मुंबई – खारघरमध्ये १६ एप्रिलला होणार असलेल्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या सन्मान सोहळ्यानिमित्त केंद्रीय गृहमंत्र्यांसह मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही येणार आहेत. गैरसोय टाळण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने कोपरा गावासमोर एका दिवसात मोठा रस्ता सिद्ध केला. या रस्त्याचे काम १५ ते २० वर्षांपासून प्रलंबित होते. खारघरवासीय रस्ता करण्याची मागणी करत होते; मात्र त्यांच्या मागणीकडे पनवेल महानगरपालिका आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष केले. (इतकी वर्षे रस्त्याचे काम प्रलंबित का ठेवले ? यासाठी उत्तरदायी असणार्या संबंधितांना कारागृहात टाका ! – संपादक)
महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार वर्ष २०२२ साठी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये घोषित करण्यात आला होता. या पुरस्काराचा वितरण सोहळा १६ एप्रिलला सकाळी १०.३० वाजता खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पार पडेल.