मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ९ एप्रिलला रात्री लक्ष्मणपुरी येथील शासकीय निवासस्थानी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सदिच्छा भेट घेतली. अयोध्या येथे उभारण्यात येणार्या महाराष्ट्र भवनाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा मनोदय या वेळी एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे व्यक्त केला.
प्रभू श्रीरामचंद्राची जन्मभूमी अयोध्या नगरीत उभारण्यात येत असलेल्या महाराष्ट्र भवनाला #हिंदुहृदयसम्राट_बाळासाहेब_ठाकरे यांचे नाव देण्याचा मनोदय यावेळी मुख्यमंत्री श्री.योगी आदित्यनाथ यांच्यासोबत बोलताना व्यक्त केला. pic.twitter.com/mjIOZOX7pE
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023
महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश या राज्यांतील संबंध अधिक वृद्धींगत करण्याविषयी या वेळी चर्चा झाल्याचे ‘ट्वीट’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेे. तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कायर्र्कर्ते यांनी शरयू नदीच्या तीरावर जाऊन नदीचे विधीवत् पूजन आणि आरती केली. येथील लक्ष्मण किला येथील महंत संकल्प महोत्सवाला एकनाथ शिंदे उपस्थित होते. या वेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष महंत गोपालदासजी महाराज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला.
तसेच उत्तर प्रदेश आणि #महाराष्ट्र या दोन राज्यातील संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याबाबत आमच्यात प्रामुख्याने चर्चा झाली.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 9, 2023