श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला जाणार !
श्रीरामाने जीवनभर सत्य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
श्रीरामाने जीवनभर सत्य आणि धर्म यांचे आचरण केले. ही शिकवण सर्व मानवजातीला प्रेरणा देणारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी संदेशात म्हटले आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून स्वा. सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत त्याच्या निषेधार्थ आणि स्वा. सावरकर यांच्या सन्मानार्थ भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या वतीने ‘आम्ही सारे सावरकर’ ही मोहीम चालू करण्यात आली आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रे’सह त्यांचे अखंड हिंदु राष्ट्र स्थापनेचे स्वप्नही साकार करावे, ही अपेक्षा !
एकनाथ शिंदे यांनी आपल्या सामाजिक संकेतस्थळांवरील ‘प्रोफाईल फोटो’ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे छायाचित्र लावले असून त्यावर ‘आम्ही सारे सावरकर’ असे लिहिले आहे.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांना न्याय देणारे आणि सर्व घटकांना सामावून घेणारे निर्णय घेण्यात आले आहेत. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला आणि युवा वर्ग यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले.
आजही काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सावरकरांचा अवमान केला. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अवमान का करतात ? सावरकर हे देशाचे दैवत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी यातना सहन केल्या.
लातूर-नांदेड ब्रॉडगेज रेल्वेमार्ग हा मराठवाड्यातील प्रमुख शहरे लातूर आणि नांदेड यांना रेल्वेमार्गाने थेट जोडण्यासाठीचा प्रकल्प आहे. या रेल्वे प्रकल्पाची लांबी ९१.३ कि.मी.असून अंदाजे मूल्य ३ सहस्र १२ कोटी रुपये आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास राज्यशासनाचा १ कोटी ५७ लाख रुपयांचा हिस्सा वितरित करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २४ मार्च या दिवशी प्रधान सचिव आणि नाशिक येथील जिल्हाधिकारी यांना दिले.
अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर सर्व मंदिरांच्या समस्या सोडवण्याविषयी संबंधित अधिकारी, मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांची स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात आयोजित मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत दिले.
विविध प्रकल्पांसाठी भूमी संपादित करतांना विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देऊनही मागील अनेक वर्षांपासून राज्यातील सहस्रावधी प्रकल्पग्रस्तांचे अद्यापही पुनर्वसन झालेले नाही.