नागपूर येथील एन्.सी.आय. म्‍हणजे मध्‍य भारतातील कर्करोगाच्‍या उपचाराचे आरोग्‍य मंदिर ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

कॅन्‍सर इन्‍स्‍टिट्यूट’मुळे (एन्.सी.आय.) कर्करोगासारख्‍या दुर्धर व्‍याधीने ग्रस्‍त रुग्‍ण आणि त्‍यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळाला आहे. ही संस्‍था विदर्भासह मध्‍यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगाणा या मध्‍य भारतातील राज्‍यांसाठी आरोग्‍य मंदिर ठरत आहे.असे ते म्‍हणाले.

शिवसेना भवनाची मालकी शिंदे गटाकडे देण्याची याचिका न्यायालयाने फेटाळली !

शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा आणि पक्षनिधी हे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाला देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

पालघर येथील बालयोगी पू. सदानंद महाराज यांच्या कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव !

२७ एप्रिल या दिवशी एकनाथ शिंदे यांनी श्रीक्षेत्र तुंगारेश्‍वर येथील आश्रमात जाऊन बालयोगी पू. सदानंद महाराज यांचे दर्शन घेतले.

बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊन प्रकल्‍प पुढे नेणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

जिल्‍ह्यातील बारसू येथील भूमीपुत्रांना विश्‍वासात घेऊनच प्रकल्‍प पुढे नेऊ. येथील लोकांवर दबावतंत्राचा वापर करणार नाही, असे आश्‍वासन मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ एप्रिल या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना दिले.

देशात जलसंवर्धनात महाराष्ट्र पहिला !

केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या गणनेचा पहिला अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये देशात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचे अभिनंदन केले आहे.

स्‍वच्‍छ आणि सुंदर शहर स्‍पर्धेत महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) नगरपालिका राज्‍यात दुसरी !

महाराष्‍ट्र शासन आयोजित शहर सौंदर्यीकरण आणि स्‍वच्‍छता स्‍पर्धा २०२२ चा निकाल घोषित करण्‍यात आला. यामध्‍ये जिल्‍ह्यातील महाबळेश्‍वर गिरीस्‍थान नगरपालिकेने राज्‍यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

काँग्रेसने देशाचा इतिहास स्वत:ला हवा तसा लिहून घेतला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

‘वीर सावरकर – फाळणी रोखण्याची क्षमता असणारा महापुरुष’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा !

मंत्री संजय राठोड यांचे खासगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी पैशांची मागणी करत असल्‍याचा आरोप !

जनतेच्‍या आरोग्‍याशी संबंधित या गंभीर प्रकाराचे सरकारने सखोल अन्‍वेषण करावे !

मुख्यमंत्र्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पुढे ढकलला !

निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान समारंभात काही श्री साधकांचे उष्माघातामुळे निधन झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात : १३ जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्यू झालेल्यांना ट्वीट करून श्रद्धांजली वाहिली आणि मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये, तर घायाळांना ५० सहस्र रुपयांचे साहाय्य घोषित केले आहे.