दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : राज ठाकरे यांनी घेतली अमित शहा यांची भेट !; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या खासदारांसमवेत बैठक !…

या भेटीत नेमके काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरे किंवा भाजप यांच्याकडून अधिकृतरित्या देण्यात आलेली नाही. साहजिकच ही भेट लोकसभेच्या निवडणुकीची पार्श्वभूमीवर असणार.

हिंदु धर्माची शक्ती संपवणारा अजून जन्माला आलेला नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

१७ मार्च या दिवशी मुंबईत ‘शिवाजी पार्क’मध्ये काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ची सांगता सभा झाली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

राज्यातील शेतकर्यांच्या १ लाख ६० सहस्र रुपयांपर्यंतच्या कर्जाचे मुद्रांक शुल्क माफ होणार !

सरकार शेतकर्‍यांच्या पाठीशी उभे रहाणारे आहे. डिजिटल क्रांतीचा वापर शेतकर्‍यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकर्‍यांच्या जीवनात क्रांती येणार आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे या वेळी म्हणाले.

अहमदनगर जिल्ह्याच्या ‘अहिल्यानगर’ नामकरणाला मंत्रीमंडळाची मान्यता !

अहमदनगर शहर आणि जिल्हा यांचे नामकरण ‘अहिल्यानगर’ असे करण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. १३ मार्चला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. याविषयी अनेक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि संघटना यांनी राज्यशासनाकडे मागणी केली होती.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता ही भेट झाली. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, तसेच अन्य उपस्थित होते.

पेठवडगाव येथील विकासाच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

दापोलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विकासकामांचे  भूमीपूजन

येथील श्री काळकाई मंदिर सभामंडप बांधकामासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन या वेळी करण्यात आले.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते.

इस्लामपूरचे ‘उरुण ईश्वरपूर’ नामकरण लवकरच ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

येथे ८ मार्च या दिवशी ‘शासन आपल्या दारी’ या नियोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ईश्वरपूर दौर्‍यावर आले होते. या वेळी त्यांनी यल्लामा चौक येथे शिवसेना सांगली जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले.

९ मार्चला मुख्यमंत्री शिंदे दापोलीत : विकासकामांचे होणार भूमीपूजन आणि सभा

खेड ते दापोली या प्रमुख राज्य मार्गासाठी ९८ कोटी रुपये संमत करण्यात आले असून विसापूर रस्त्यासाठी ३५ कोटी रुपयांचा निधी संमत झाला आहे.