मंडणगड : ५ गावांतील महाविकास आघाडीच्या सहस्रो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश !

विधानसभा निवडणुकांपुर्वी तालुक्यातील अनेक गावे राज्यातील शिंदे सरकाराच्या कारभारावर विश्‍वास ठेवून शिवसेनेत सहभागी होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.

नाशिक येथे शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेकडून निवडणुकीचा अर्ज भरला !

‘भक्तपरिवार आणि जनता जनार्दन यांच्या वतीने मी निवडणूक लढवतोय’, असे शांतीगिरी महाराज म्हणाले. शिवसेनेनं ‘एबी फॉर्म’ दिलेला नसतांनाही तुम्ही त्यांच्याकडून अर्ज कसा भरला ?

उत्तरप्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी आणण्याची शिवसेनेच्या आमदारांची मागणी !

शिवसेनेच्या आमदारांनी उत्तरप्रदेशच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही हलाल उत्पादनांवर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात हलाल उत्पादनांची चौकशी करण्याचा आदेश दिला.

महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस यांसह भाजपच्या ३ नेत्यांच्या अटकेचा कट ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे आणि स्वत:मध्ये वाद निर्माण होण्यामागील कारण सांगतांना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतांना मला ‘वर्षा’ बंगल्यावर बोलावले गेले आणि १ घंटा वाट पहायला लावली. असे २ वर्षे सातत्याने होत होते.

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडून आवेदन प्रविष्ट !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही हातकणंगले मतदारसंघासाठी आवेदन प्रविष्ट केले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी आवेदन प्रविष्ट केले.

ठाणे, कल्याण आणि डोंबिवली येथे हिंदु नववर्षाचे उत्साहात स्वागत !

श्री कौपिनेश्वर महाराज की जय, हर हर महादेव, जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा घोषणा देत ठाणेकरांनी स्वागतयात्रेच्या माध्यमातून नववर्षाचे स्वागत केले.

भावना गवळी यांना वार्‍यावर सोडणार नाही ! – मुख्यमंत्री

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यवतमाळ-नांदेड मतदारसंघात हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. तेथे गेल्या २५ वर्षांपासून खासदार असलेल्या भावना गवळी यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून १६० उमेदवारी अर्ज भरले !

२८ मार्च या दिवशी या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे. ३० मार्च हा अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे.

महाराष्ट्रातून ४५ जागा निवडून देणे महत्त्वाचे !

जागावाटपापेक्षा देशात महाविकास आघाडीला ४०० पेक्षा अधिक जागा कशा मिळतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ जागा कशा निवडून येतील हे पाहू. त्यामुळे वेळप्रसंगी त्याग करायला सिद्ध रहा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Omar Abdullah Maharashtra Bhavan : (म्हणे) ‘आमची सत्ता आल्यावर जम्मू-काश्मीरमधील महाराष्ट्र भवन बंद करू !’ – ओमर अब्दुल्ला

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य आहे का ? – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रश्‍न