एप्रिलपासून ‘शून्य औषध चिठ्ठी’ योजनेची कार्यवाही ! – मुख्यमंत्री

मुंबईकरांच्या वैद्यकीय उपचारावरील खर्च न्यून करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. ‘आरोग्य आपल्या दारी’ मोहीम चालू करण्यात आली असून याद्वारे घरोघरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्यान’ आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित करावे !

पैठण येथील ‘संत ज्ञानेश्वर उद्याना’चा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा. यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही’, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ मार्च या दिवशी येथे दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडून धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप !

हर्षवर्धन पाटील यांनी पत्रात म्हटले आहे की, इंदापूरमधील मित्रपक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे आणि सभा यांमधून माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर एकेरी अन् शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करत आहेत.

शिवमंदिर परिसराचा विकास झाल्यानंतर लोक ‘चलो अंबरनाथ’ही म्हणतील ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथ हे वाढते शहर आहे. वाढत्या शहराची आवश्यकता लक्षात घेऊन आपण विकासाला कुठेही पैसे अल्प पडू देणार नाही. शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विकसित केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘मेट्रो-१२’चे भूमीपूजन !

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एम्.एम्.आर्.डी.ए.) या मार्गिकेची उभारणी केली जात आहे. आरेखन पालटामुळे या मार्गिकेला विलंब झाला आहे.

विधीमंडळाचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन यशस्वी ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लोकांच्या हिताचे िनर्णय घेण्यात आले आहेत. देशाच्या विकासात योगदान देणारा अंतरिम अर्थसंकल्प मांडल्याने हे अधिवेशन यशस्वी झाले, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

इचलकरंजी शहर पाणीपुरवठा योजनेसाठीच्या तज्ञ समितीचा अहवाल १ मासात द्यावा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) शहरासाठी पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी पाणीपुरवठा योजना चालू करण्यासंदर्भात तज्ञांची समिती नेमून १ मासात अहवाल देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले.

कर्मचारी आणि अधिकारी यांना ‘सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना’ लागू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १ नोव्हेंबर २००५ या दिवशी आणि त्यानंतर नियुक्त होणार्‍या राज्यातील कर्मचारी-अधिकारी यांच्यासाठी ’सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना’ लागू करण्याचा निर्णय १ मार्च या दिवशी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांत घोषित केला.

वारकर्‍यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली असून आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे,

कला आणि संस्कृती क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी समिती नियुक्त करणार ! – मुख्यमंत्री

महाराष्ट्राला कला आणि संस्कृती यांचा अत्यंत गौरवशाली वारसा लाभला आहे. कला आणि संस्कृती यांच्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी शासन कटीबद्ध आहे.