प्राध्यापकांनी नक्कल (कॉपी) करण्यासाठी ६ विद्यार्थ्यांकडून घेतले प्रत्येकी ५०० रुपये !

गडचिरोली येथे शिक्षण क्षेत्राला काळीमा फासण्याचा प्रकार !

कोलगाव (सिंधुदुर्ग) येथे नवीन इमारत बांधूनही शाळा भरते जुन्याच धोकादायक इमारतीत !

जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ ची नवी इमारत बांधून १ वर्ष पूर्ण झाले आहे. आता श्रेयवाद बाजूला ठेवून विद्यार्थ्यांच्या जीविताच्या दृष्टीने शाळेच्या नवीन इमारतीचे नियंत्रण मुख्याध्यापकांकडे द्यावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.  

दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झाल्‍याचा आरोप निराधार ! – चौकशी समिती

मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेमध्‍ये शिकणार्‍या दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण असल्‍याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.

बनारस हिंदु विश्‍वविद्यालयामध्ये होळी खेळण्यावर बंदी !

जर हिंदूंच्या सणावर बंदी घालायची असेल, तर अन्य धर्मियांच्या सणांवर ती घातली पाहिजे ! नावात ‘हिंदु’ शब्द असतांना याउलट नियम विश्‍वविद्यालयाकडून घातला जात असेल, तर त्याला विरोध होणारच !

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज अँड नॉटिकल इंजिनीयरिंग ट्रेनिंग (सिफनेट)ची शाखा रत्नागिरीत चालू करा

पश्‍चिम किनारपट्टीवरील चार राज्यांत मोठी किनारपट्टी असूनही येथे सिफनेटची एकही शाखा नाही. सिफनेटद्वारे नॉटिकल इंजिनीयरींग मधील ४ वर्षांच्या पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम शिकवले जातात. याचा लाभ येथील मासेमार, तसेच अनेक तरुणांना होऊ शकतो.

इयत्ता १२ वीच्या ‘गणित’ विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ! – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ

या विषयाची प्रश्‍नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोचल्याचे राज्यात कुठेही आढळून आलेले नाही. याविषयी पोलीस अन्वेषण करत आहेत. त्यामुळे ‘गणित’ या विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही.

केवळ ४ शैक्षणिक संस्थांवर गुन्हे नोंद, वसुलीचे काम चालूच !

केंद्रशासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती लाटून १ सहस्र ८२६ कोटी रुपयांचा घोटाळा वर्ष २०१७ मध्ये उघड झाला. याच्या चौकशीसाठी विशेष अन्वेषण पथक नियुक्त करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपामुळे ४ सहस्र ५०० हून अधिक अंगणवाड्या बंद !

जनतेला संप करावा न लागता त्यांच्या अडचणी सोडवण्याची मानसिकता प्रशासनाने ठेवावी, असेच जनतेला वाटते !

परभणी येथे प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांना पाठवणार्‍या ६ शिक्षकांना अटक !

कालिदास कुलकर्णी, बालाजी बुलबुले, गणेश जयतपाल, रमेश मारोती शिंदे, सिद्धार्थ सोनाळे आणि भास्कर तिरमले अशी अटक केलेल्या शिक्षकांची नावे आहेत. शिक्षकांनी प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र काढून ते व्हॉटस्ॲपवर अन्य विद्यार्थ्यांना पाठवले.

राष्ट्रवाद आणि अध्यात्मवाद भक्कम करणार्‍या पाठ्यक्रमामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल ! – योगऋषी रामदेवबाबा

भारताचा संपूर्ण जगात गौरव होईल, असे आत्मबळ विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले पाहिजे. आपल्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती आहे आणि ती शक्ती योगामुळे जागृत होत असते.