कराड, २२ फेब्रुवारी (वार्ता.) – अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे जिल्ह्यातील ४ सहस्र ५१२ अंगणवाड्या गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत.
‘एकात्मिक बालविकास प्रकल्पा’चे खासगीकरण थांबवण्यासाठी, गरोदर आणि स्तनदा माता, किशोरवयीन मुली, तसेच ० ते ६ वर्षे वयोगटातील मुलांना चांगली सेवा पुरवण्यासाठी, कर्मचार्यांच्या मानधनात वाढ करावी यांसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या वतीने सातारा येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी ठिय्या मांडत बेमुदत संप केला आहे. सरकार या मागण्या मान्य करणार कि नाही ? तसेच आंदोलन आणखीन चिघळणार का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
संपादकीय भूमिकाजनतेला संप करावा न लागता त्यांच्या अडचणी सोडवण्याची मानसिकता प्रशासनाने ठेवावी, असेच जनतेला वाटते ! |