बरेली (उत्तरप्रदेश) येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेमध्ये मुलांना रक्षाबंधन साजरे करण्यापासून अडवले !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील आमलामधील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेमध्ये मुलांना रक्षाबंधन साजरे करण्यापासून अडवले. शाळेतील मुले रक्षाबंधनाच्या निमित्ताने एकमेकांना राख्या बांधत होती. शाळेच्या व्यवस्थापनाने हस्तक्षेप करत सर्व मुलांना असे करण्यापासून रोखले आणि त्यांच्या हातावर बांधलेल्या सर्व राख्या काढायला लावल्या. याविषयी माहिती मिळताच मुलांच्या पालकांनी शाळेत जाऊन शाळेच्या व्यवस्थापनाचा निषेध केला. त्यानंतर व्यवस्थापनाने पालकांची क्षमा मागितली.

राखी, मेहंदी किंवा टिळा लावून शाळेत आल्यावर विद्यार्थ्यांना शिक्षा करता येणार नाही ! – राष्ट्रीय बाल हक्क  संरक्षण आयोग

राखी बांधून, मेहंदी किंवा टिळा लावून, कलव (रंगीत धागा) घालून  शाळेत आलेलया विद्यार्थ्यांना शिक्षा झाल्याचे अनेकदा घडते. अशा वेळी शाळेच्या प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना शिक्षा दिली जाते. याविषयीची ‘राष्ट्रीय बाल हक्क  संरक्षण आयोगाने नोंद घेतली आहे. आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी सांगितले की, ‘शिक्षण हक्क कायदा, २००९’ च्या कलम १७ च्या अंतर्गत शाळांमध्ये शारीरिक शिक्षा प्रतिबंधित आहे. सण किंवा उत्सव यांच्या वेळी शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचारी यांच्याकडून विद्यार्थ्यांचा छळ केला जातो किंवा त्यांच्याशी भेदभाव केला जातो. सणांच्या वेळी शाळा मुलांना राखी, टिळा किंवा मेहेंदी लावू देत नाहीत. या कालावधीत मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जातो, असे कानूनगो यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

कॉन्व्हेंट शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! सरकारने अशा शाळांची अनुमती रहित करायला हवी, तरच यापुढे असे धाडस कुठल्या शाळा करणार नाही !