कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून लिहून घेत आहे प्रतिज्ञापत्र !
कोलकाता (बंगाल) – कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयाकडून प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेश अर्जासमवेतच एक प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. यात ‘आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर मी कधीही महाविद्यालयाच्या आवारात फाटलेली किंवा तशी संचरना केलेली जीन्स घालणार नाही. आक्षेपार्ह कपडे परिधान करणार नाही. महाविद्यालयाच्या आवारात मी नियमानुसार अनुमती असणाराच पेहेराव करीन’, असे नमूद करण्यात आले आहे. या प्रतिज्ञापत्रावर विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून प्रवेश अर्जासमवेत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
This college in India’s Kolkata city is banning torn jeanshttps://t.co/V4pqm9FIwh
— WION (@WIONews) August 31, 2023
नियमांचे पालन करावेच लागेल ! – प्राचार्या
याविषयी महाविद्यालयाच्या प्राचार्या पूर्णा चंद्रा मैती यांनी म्हटले की, गेल्या वर्षीही आम्ही अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना काढल्या होत्या; पण तरीही काही विद्यार्थी महाविद्यालयात फाटक्या जीन्स घालून येत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच यावर्षी आम्ही नव्याने प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांसाठी हे प्रतिज्ञापत्र लिहून घेत आहोत. महाविद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांनी त्यांना हवे तसे कपडे घालावेत. महाविद्यालयाच्या आवारात त्यांना शिस्त आणि नियम यांचे पालन करावेच लागेल.
संपादकीय भूमिकाबोस महाविद्यालयाचा अभिनंदनीय निर्णय ! असा निर्णय प्रत्येक महाविद्यालयाने घ्यावा ! यासाठी पालकांनी आग्रही भूमिका घ्यावी ! |