देशातील शिक्षणव्यवस्थेची दुरवस्था दर्शवणारे एक प्रातिनिधिक उदाहरण !

गोव्यातील सत्ताप्राप्तीसाठी सवंग घोषणा करून मतदारांना भुलवणार्‍या सर्वपक्षीय राजकारण्यांनी गोव्याचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा जतन करण्यासाठी कृतीशील प्रयत्न करावेत, अशी धर्मप्रेमी गोमंतकियांची अपेक्षा आहे !

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना अटक केली !

शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचा ठपका तुकाराम सुपे यांच्यावर आहे.

राज्यातील १६६ लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांचे अद्याप निलंबन नाही

घोटाळेबाजांना कठोर शिक्षा न दिल्यानेच त्यांचे फावते. त्यामुळे खासगी असो वा शासकीय क्षेत्र असो, भ्रष्टाचार करणार्‍यांना कठोर शिक्षा होते, हा पायंडा पडला, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल !

विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गाव यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

जागतिक पातळीवर प्रगती करतांना विद्यार्थ्यांनी आपला देश, राज्य आणि गाव यांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे. देशाच्या उत्कर्षाचा विद्यार्थ्यांनी प्राधान्याने विचार करावा.

ज्ञानाचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

उच्च शिक्षण आणि पदवी प्राप्त केल्यानंतर अनेकांचा व्यावसायिक भविष्याकडे ओढा असतो; मात्र त्यापूर्वी युवा पिढीने आपल्या उमेदीच्या काळात आपले ज्ञान आणि कौशल्य यांचा उपयोग समाजोद्धारासाठी करावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जिहादी शिक्षण आणि भारत !

भारतातील मदरशांमधून दिले जाणारे धर्मांधतेचे शिक्षण बंद होण्यासाठी सरकारने राज्यघटनेत आवश्यक ते पालट करायला हवेत. राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी हे स्वागतार्ह असेल !

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

पाकमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात असूनही हिंदूबहुल भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी तो रोखण्यासाठी काहीही केले नाही, हे सत्य जाणा !

‘पहिलीपासून इंग्रजी’ म्हणजे विद्यार्थ्यांचे शिक्षण भाषाजड होण्यासह मातृभाषा मराठीसह अभिजात भाषांवरही शैक्षणिक संकट !

भाषाजड शिक्षणामुळे राष्ट्राच्या आधिभौतिक उत्कर्षास आवश्यक आणि पोषक असलेल्या विज्ञान, गणित इत्यादी महत्त्वाच्या विषयांच्या पर्याप्त अभ्यासास विद्यार्थी विन्मुख होण्याची शक्यता आहे. ही एक प्रकारे राष्ट्रीय हानीच आहे.

मातृभाषा आणि मातृभूमी यांविषयीच्या अभिमानाची जाणीव शिक्षणातून संवर्धित व्हावी ! – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

नवीन शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा आग्रह धरण्यात आल्याचे स्पष्ट करून राज्यपाल म्हणाले की, मातृभाषेविषयी आस्था आणि अभिमान जोपासतांना तिच्याविषयीच्या जाणिवा वृद्धींगत होण्यासाठी कृतीशील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

ग्रामीण भागातही मुलींना ‘व्यावसायिक शिक्षण’ देण्याची  व्यवस्था व्हायला हवी ! – विलास माने

‘खेडेगावांत ४-५ सहस्र वस्ती आहे. तेथे केवळ ४ थी ते ७ वी पर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे मुलांना १० वीपर्यंत शिक्षणासाठीसुद्धा तालुक्याच्या ठिकाणी अथवा मोठ्या शहरात जावे लागते. त्यामुळे मुलींची ३० ते ४० टक्के लोकसंख्या पुढे शाळा शिकू शकत नाही.