जिहादी शिक्षण आणि भारत !

संपादकीय

प्रतिकात्मक छायाचित्र

भारतातील शेकडो हिंदू निधर्मीपणाच्या भ्रामक संकल्पनांना वास्तव मानून जगतात.  अशा सेक्युलर हिंदूंनाही दोष देता येत नाही; कारण त्यांना लहानपणापासून शिक्षणच अशा प्रकारचे दिले गेले की, ज्यामुळे त्यांची विचारसरणी ‘सेक्युलर’ होते आणि वास्तव जीवनापासून ते दूर जातात. भारतात स्वातंत्र्यानंतर साम्यवादी आणि निधर्मीवादी लोकांनी  भारतीय शिक्षणप्रणालीवर नियंत्रण मिळवले. भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानने मात्र स्वत:च्या शिक्षणप्रणालीत जिहादी धर्मांधतेला केंद्रीभूत ठेवले. गेली कित्येक दशके पाकच्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाद्वारे जिहादी धर्मांधतेचे विष भिनवले जात आहे. नुकतेच पाकिस्तानमधील एका पत्रकाराने धक्कादायक खुलासा केला. या पत्रकाराने सांगितले, ‘माझ्या मुलाने मला ‘तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाही ?’, असा प्रश्न विचारला.’ यावरून संबंधित पत्रकाराने पाकिस्तानमध्ये मुलांना दिल्या जाणार्‍या शालेय शिक्षणावरून चिंता व्यक्त केली आहे. पत्रकाराने सांगितलेला हा अनुभव पाकिस्तानचे गोडवे गाणार्‍या भारतातील लोकांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आहे. खरे तर पाकमध्ये मुलांना उघडपणे हिंदुद्वेषाची शिकवण दिली जाते. याविरोधात हे पत्रकार बोलले, एवढेच काय ते नवीन ! ही स्थिती पाकिस्तानातील हिंदूंसाठी चिंताजनक तर आहेच, शिवाय भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने, तसेच भारतातील हिंदूंच्या दृष्टीनेही ती घातक आहे. ‘सेक्युलर’वादाच्या भ्रामक जगात जगणार्‍यांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर भारत सरकारनेही या विषवल्लीचा धोका जाणून कठोर धोरणे अंगीकारणे आवश्यक आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारतामध्ये अल्पसंख्य विशेषत: मुसलमान असुरक्षित असल्याची बतावणी करून भारताला फुकाचे सल्ले दिले होते. ‘सूर्यवंशी’ चित्रपटासंदर्भात पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ‘या चित्रपटामुळे भारतात इस्लामद्वेषाला आणखी हवा मिळेल’, असे विधान केले होते. भारतावर बिनबुडाचे आरोप करणारे पाकचे लोकप्रतिनिधी ‘स्वत:च्या देशात हिंदूंची काय स्थिती आहे ?’ याकडे लक्ष देत नाहीत. उलट जागतिक स्तरावर भारताची अपकीर्ती करण्याचे काम करतात. ‘अशा कावेबाज पाकला भारत आणखी किती दिवस सहन करणार ?’, हा प्रश्न आहे.

भारतासाठी असलेला धोका !

पाकिस्तानमध्ये भौतिक विकास, शिक्षण, मानवतावाद यांपेक्षा जिहादी धर्मांधतेला धरून निर्णय घेतले जातात, हे आतापर्यंत अनेक घटनांमधून समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी ईशनिंदा केल्याच्या निवळ आरोपावरून श्रीलंकेच्या नागरिकाला पाकमध्ये जिवंत जाळण्यात आले. यावरून पाकिस्तानी नागरिकांच्या भावना या धर्माभोवती केंद्रीभूत आहेत, हे लक्षात येते. तेथील नागरिकांमध्ये धर्मांधता एवढी भिनली आहे की, प्रसंगी ते क्रूरही होतात. याची पाळेमुळे त्यांना मिळणार्‍या शिक्षणात आहे. भारतातील मदरशांमधूनही याच धर्माच्या नावाखाली शिक्षण दिले जाते. यावरून ‘भारतातील मदरशांमध्येही शिकणारी मुले भविष्यात काय करणार ?’ हे स्पष्ट होते. भारतात पाकिस्तानचे झेंडे फडकावले जातात. पाकच्या विजयाच्या घोषणा दिल्या जातात. पाकच्या आतंकवाद्यांना भारतात ठिकठिकाणी आश्रय दिला जातो. हे सगळे हितसंबंध जोपासले जातात, ते केवळ धार्मिक सूत्राच्या धाग्यावरून. धर्मांध त्यांच्या धर्मासाठी काहीही करायला सिद्ध असतात. पाकिस्तान काय किंवा भारत काय, दोन्ही देशांतील धर्मांधांचे ‘काफिरांना ठार मारणे’, हे एकच लक्ष्य आहे आणि याची शिकवण त्यांना धार्मिक शिक्षणातून दिली जाते, हे सत्य नाकारणे भारतातील हिंदूंसाठी आत्मघातकी ठरणारे आहे.

भारताचे शत्रू ओळखणे आवश्यक !

गेल्या वर्षी ब्रिटनमधील दळणवळण नियामक कार्यालय ‘ऑफकॉम’ने अर्णव गोस्वामी संपादक असलेल्या ‘रिपब्लिक भारत’ या वृत्तवाहिनीला १९ लाख ७३ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला होता. या वाहिनीवरील एका कार्यक्रमात पाकिस्तानी नागरिकांना आतंकवादी संबोधल्याचा, तसेच द्वेषयुक्त भाषा वापरल्याचा वाहिनीवर आरोप करण्यात आला होता. ‘पाकिस्तानी नागरिकांची काय मानसिकता आहे ?’ तसेच ‘त्यांना कोणती शिकवण मिळते ?’ हे खरे तर जगजाहीर आहे; मात्र ब्रिटनसारखे देश पाकच्या नागरिकांना पाठीशी घालतात. हा त्यांचा हिंदुद्वेष आणि पर्यायाने भारतद्वेष आहे. अशा देशांवर भारत सरकारने मित्रराष्ट्रांचे साहाय्य घेऊन धाक निर्माण करायला हवा. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नवज्योतसिंह सिद्धू यांनी ‘इम्रान खान माझे भाऊ आहेत’, असे वक्तव्य केले होते. ज्या पाकमध्ये हिंदूंना ठार मारण्याची शिकवण दिली जाते, त्या पाकच्या पंतप्रधानांना ‘भाऊ’ संबोधणारे हिंदु समाजासाठी घातक नव्हे का ? सिद्धू यांच्यावर त्यांचा काँग्रेस पक्ष काहीच कारवाई करत नाही, उलट त्यांना पदांची खैरात वाटली जाते. अशा काँग्रेस पक्षाला हिंदु समाजाने का झेलावे ?

सरकारने सतर्क व्हावे !

प्रतिकात्मक छायाचित्र

शिक्षणाच्या माध्यमातून पसरवला जाणारा हिंदुद्वेष आणि जिहादी धर्मांधता रोखण्यासाठी भारत सरकारपुढे अनेक आव्हाने आहेत, हेही तितकेच खरे. सरकारने मदरशांच्या संदर्भात कठोर धोरण अवलंबले तर पहिल्यांदा भारतातूनच असहिष्णुतेच्या आरोळ्या उठू शकतात. असे असले, तरी देशाच्या आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने  सतर्क रहाणे आवश्यक आहे. सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकचे खरे स्वरूप उघड करून कठोर धोरण अवलंबू शकते. यासाठी सरकारला भारतियांचा मोठ्या प्रमाणात जनाधार मिळेल. तसेच भारतातील अंतर्गत पाकप्रेमींचा बंदोबस्त करण्यासाठी देशद्रोहाशी संबंधित कठोर कायदे करण्याचे प्रभावी शस्त्र सरकारच्या हाती आहे. याचा उपयोग करून सरकारने भारतातील पाकधार्जिण्यांचा बंदोबस्त करायला हवा. भारतातील मदरशांमधून दिले जाणारे धर्मांधतेचे शिक्षण बंद होण्यासाठी सरकारने राज्यघटनेत आवश्यक ते पालट करायला हवेत. राष्ट्रप्रेमी हिंदूंसाठी हे स्वागतार्ह असेल !