परदेशी विद्यापिठांमुळे उच्‍च शिक्षणामध्‍ये दरी निर्माण होण्‍याची भीती ! – शिक्षणतज्ञांचे मत

परदेशी विद्यापिठांना मुक्‍तद्वार (प्रवेश) दिल्‍यास देशातील उच्‍च शिक्षण आणि उच्‍च शिक्षण संस्‍थांवर विपरित परिणाम होणार असल्‍याचे मत शिक्षणतज्ञांनी व्‍यक्‍त केले आहे.

अफाट कार्य करूनही दुर्लक्षित राहिलेले आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर !

नोकरीचा किरकोळ अर्ज संग्रहालयात ठेवण्‍याइतपत प्रभावीपणे मांडणार्‍या एका मराठी बुद्धीवंताचा म्‍हणजे आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर यांचा थोडक्‍यात परिचय आणि त्‍यांनी केलेले उत्तुंग कार्य येथे देत आहोत.

संभाजीनगर येथे स्‍वसंरक्षणासाठी इयत्ता ८ वी आणि ९ वीच्‍या विद्यार्थिनींना लाठीकाठीचे प्रशिक्षण !

गेल्‍या काही मासांमध्‍ये विद्यार्थिनींविषयी घडणार्‍या शहरातील घटना पहाता मुलींना वाईट प्रसंगात विरोध करता यावा. त्‍यांनी वेळप्रसंगी स्‍वत:चे रक्षण स्‍वत: करावे, या उद्देशाने सावित्रीबाई फुले यांच्‍या जयंतीनिमित्त शहरातील शारदा मंदिर कन्‍या प्रशालेत विद्यार्थिनींसाठी लाठी-काठी प्रशिक्षणास प्रारंभ करण्‍यात आला आहे.

पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

शाळेत शिक्षकांची संख्या अल्प आहे त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी फेब्रुवारीपर्यंत सर्व शिक्षकांच्या मुलाखती पूर्ण होतील आणि मार्चमध्ये त्यांना नेमणुका दिल्या जातील. पटसंख्या अल्प आहे म्हणून राज्यातील एकही शाळा बंद केली जाणार नाही, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

मी असे शिक्षण स्वीकारू शकत नाही, जिथे माझी आई आणि मुलगी शिकू शकत नाही !

भारतातील महाविद्यालयांत मुसलमान विद्यार्थिनींनी हिजाब घालण्याचे समर्थन करत अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा उदोउदो करणारे कथित धर्मनिरपेक्षतावादी अफगाणिस्तानातील तालिबानच्या महिलाविरोधी जाचक नियमांवर मात्र चकार शब्दही काढत नाहीत !

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार ! – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

राज्यातील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक’ शिष्यवृत्ती योजना चालू करण्याविषयी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

विद्यार्थिनीला उत्तीर्ण करण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडणार्‍या प्राध्यापकाला अटक !

असे प्राध्यापक म्हणजे शिक्षणक्षेत्राला लागलेला कलंक. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक !

जिल्हा परिषदेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळत नसल्याची विधानसभेत लोकप्रतिनिधींनी मांडली समस्या !

गिरीश महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत, ‘शाळांमध्ये गळती होत आहे’ मात्र सध्या निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगितले.

३१ डिसेंबरपर्यंत इयत्ता बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना आधारकार्डशी लिंक करणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

राज्यातील एकूण ५ लाख १३ सहस्र १६३ विद्यार्थ्यांता आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे. आधारकार्डशी लिंक केल्यामुळे विद्यार्थ्यांची २ वेळा नावे येणार नाहीत.

येत्या शैक्षणिक वर्षात ३० सहस्र शिक्षकांची भरती करणार ! – दीपक केसरकर, शिक्षणमंत्री

‘प्रत्येक विषयासाठी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. शिक्षकांच्या भरतीमुळे शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गळती थांबेल’, असे केसरकर यांनी सांगितले.