रुग्णालयांतील आगी !
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्या आगीचे सूत्र ऐरणीवर आले
महाराष्ट्रातील नगर जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयातील अतीदक्षता विभागाला ६ नोव्हेंबरला लागलेल्या आगीमध्ये ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा रुग्णालयांमध्ये लागणार्या आगीचे सूत्र ऐरणीवर आले
अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल !
तत्कालीन केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मराठी भाषिक ६५ वर्षांपासून त्यांच्या या अधिकारासाठी लढत असून अजूनही ते न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत. केंद्रशासनानेच पुढाकार घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांना पुस्तकांची गोडी लागेल, यासाठी सारस्वतांकडून विशेष प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. वास्तविक वाचन संस्कृती वाढवण्याचे दायित्व साहित्यिक आणि लेखक यांच्यावर नाही का ? अशा गोष्टींवरही संमेलनात ऊहापोह होणे अत्यावश्यक आहे.
स्वायत्त अधिकार असलेल्या निवडणूक आयोगाने एकदा स्वत:ची भूमिका निश्चित करावी ? वाघ होऊन डरकाळी फोडावी कि वाघाची मावशी होऊन दुर्लक्ष करावे, हे त्यांच्याच हातात आहे.
‘सरदार उधम’ चित्रपटाच्या माध्यमातून भारतावर झालेल्या अन्यायाला जागतिक व्यासपिठावर वाचा फोडण्याची आलेली ही नामी संधी भारताने गमावली आहे. राष्ट्रप्रेमाचा अभाव कुठे कुठे जाणवतो ?, हे सांगण्यासाठी हे उदाहरण पुरेसे आहे. भारतियांनी अंतर्मुख होण्याची किती आवश्यकता आहे ?, हे यातून प्रकर्षाने लक्षात येते !
देशभरातील हिंदूंनी प्रांतीय कक्षा विस्तारून हिंदु म्हणून संघटित होऊन मंदिरे सरकारच्या कह्यातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणे, हे हिंदूंचे कर्तव्यच आहे. मंदिरांचे पावित्र्य टिकले, तरच पुढील कठीण काळात हिंदू टिकतील (हिंदूंचे अस्तित्व राहील), हे लक्षात घ्यायला हवे !
राष्ट्रपती भवनातील थोडीथोडकी नव्हे, तर ४० लाख रुपयांची धारिकांची रद्दी विकण्यात आली आहे. जवळजवळ पावणे चौदा लाख धारिका या वेळी हटवण्यात आल्या आणि त्यामुळे ८ लाख ६ चौरस फूट जागा रिकामी झाली. ‘ही जागा ४ राष्ट्रपती भवन उभी राहू शकतील एवढी मोठी आहे’, असे म्हटले जात आहे.
‘फेसबूक’ या आस्थापनाने ‘मेटा’ हे नाव आता धारण केले आहे. केवळ पैशांसाठी ग्राहक वाढतात म्हणून द्वेषपूर्ण टीका, भांडणे लावणे, हिंदुद्वेष आदी गोष्टी फेसबूकवर चालू दिल्या जात असल्यामुळे फेसबूकची जगात अपकीर्तीही होत आहे. त्यामुळे नाव पालटण्यामागे काही धोरणे पालटणे, प्रतिमा सुधारणे हा फेसबूकचा उद्देश आहे.