बिहारमधील हिंदुद्रोहाची मालिका !

हिंदूबहुल राज्यात हिंदु शासनकर्त्यांकडून अशा प्रकारचे निर्णय घेतले जातात, हे हिंदूंसाठी लज्जास्पदच म्हणावे लागेल. आज मंदिरे, पिंड वेदी यांवर कर लावून त्यातून शुल्क घेणारे पुढे हिंदूंच्या प्रत्येक धार्मिक सण, कार्यक्रम आणि अंत्यसंस्कार यांवरही शुल्क वसूल करू लागले, तर आश्चर्य वाटू नये.

विदेशात भारतीय औषधांचा आग्रह !

‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेनुसार आता शस्त्रेही भारतीय बनावटीची सिद्ध होत आहेत. हाच भाग आता औषधांच्या संदर्भात होऊन भारतीय आस्थापनांचा जगभरात नावलौकीक होईल, हे निश्चित !

नसीरुद्दीन शाह भयग्रस्त का ?

यापुढे, …… अशा धर्मनिरपेक्षतेमुळेच आपला घात झाला आहे’, हे हिंदूंनी ओळखले आहे. हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ घेऊन आज शाह हिंदूंनाच धमकी देत आहेत. आज धमकी देणारे धर्मांध हिंदूंच्या विरोधात कृतीही करतील. त्यामुळे हिंदूंनी सर्वधर्मसमभावाच्या पेचात न अडकता हिंदूंचे हित साधणारे हिंदु राष्ट्र स्थापन करणे, हेच हिताचे ठरते !

ख्रिस्तीप्रेम नव्हे हिंदुद्वेष !

मानवतेच्या कथित तारणहार मदर तेरेसा यांच्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’शी संबंधित संस्थांची सर्व खाती रिझर्व्ह बँकेने गोठवली. यामुळे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्या जिवाला घोर लागला आहे.

‘शक्ती’ नवी; पण यंत्रणा तीच !

सध्या महाराष्ट्रात चालू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कठोर कारवाई व्हावी, यासाठी ‘शक्ती’ विधेयक संमत करण्यात आले.

हिमंत बिस्व सरमा यांची हिंमत !

प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेम, देशासाठी काहीतरी करण्याची तळमळ, तत्त्वनिष्ठता, निर्णय घेण्याची धमक अन् भक्कम वैचारिक दृष्टिकोन स्पष्ट असेल, तर कोणताही निर्णय घेऊ शकतो, हे सरमा यांनी दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श इतर मुख्यमंत्र्यांनी घेतल्यास हिंदू आणि भारताच्या अनेक समस्या सुटून हिंदु राष्ट्र मूर्त स्वरूपात येईल !

लुटीचा ‘साम्यवादी’ मार्ग !

केरळचे मत्स्योत्पादनमंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी पिनराई विजयन् सरकारने ४ लाख १० सहस्र रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. ‘चेरियन यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ७ मासांच्या कार्यकाळात काय जनताभिमुख कारभार केला ?’, हा संशोधनाचा विषय आहे.

आध्यात्मिक क्रांतीच्या दिशेने… !

हिंदूंमध्ये धर्माभिमान वाढत असल्याने आता साहजिकच राजा बनू पहाणार्‍यांनाही हिंदु धर्माच्या महतीपुढे झुकावे लागत आहे. हिंदु राष्ट्राच्या पुनर्स्थापनेपूर्वीचा हा संधीकाळ आहे आणि त्यानुसार अधिकाधिक हिंदूंचा धर्माचरणाकडे कल वाढला आहे. त्यामुळे ‘धार्मिक ग्रंथांची वाढती मागणी’, हा या आध्यात्मिक क्रांतीचाच एक भाग म्हणावा लागेल !