Goa Funds Electoral Bonds : निवडणूक रोख्यांद्वारे गोव्यात भाजपला २७ कोटी, तर काँग्रेसला १ कोटी ८० लाख रुपये मिळाले !

१२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.

Delhi CM Arrested : अरविंद केजरीवाल यांना ६ दिवसांची ईडी कोठडी !

देहली राज्याचे मद्य धोरण बनवण्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांचा सहभाग होता. धोरणामुळे केजरीवाल सरकारला मद्य विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मिळाली. या पैशांतून पंजाब आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यात आला.

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी निधी संमत

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारण्यासाठी ६३० कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. उमरोळी येथील जागा मध्यवर्ती कारागृहासाठी निश्चित करण्यात आली आहे.

पिंपरी (पुणे) येथील रेल्वेच्या सेवानिवृत्त ‘ट्रॅकमन’कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती !

नोल्ला हे पुणे येथील खडकी रेल्वेस्थानकामधून ऑगस्ट २०२३ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांनी एप्रिल २००८ ते ऑगस्ट २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थावर आणि जंगम मालमत्ता खरेदी केली.

पुणे परिमंडळातील ५ लाख वीजग्राहकांकडे १२४ कोटी रुपयांची थकबाकी

एवढ्या मोठ्या प्रमाणात थकबाकी कशी काय रहाते ? याला उत्तरदायी असणार्‍यांनाही कठोर शिक्षा होणे आवश्यक ! शासकीय सुटीच्या दिवशी वीजदेयक भरणा केंद्रे चालू करणे, म्हणजे ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ असेच म्हणावे लागेल !

लोकसभा निवडणुकीत उमेदवारांना करावा लागणार वाढीव निवडणूक खर्च !

गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदाचे खर्चाचे शुल्क १२ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. यात शाकाहारी जेवणासाठी १०० ऐवजी ११२ रुपये आणि मांसाहारासाठी २२४ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. चहा, कॉफी, लस्सी, थंड पेये, तसेच अल्पाहार यांचेही शुल्क वाढवण्यात आले आहे.

‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या अहवालानुसार देशात २ लाखांहून अधिक करोडपती !

गेल्या ५ वर्षांत देशातील करोडपती व्यक्तींची संख्या ही जवळजवळ दुप्पट झाली आहे. देशातील आर्थिक विषमता एका बाजूला हळूहळू कमी होत असतांना दुसरीकडे व्यक्तीगत पातळीवर नागरिकांच्या वार्षिक उत्पन्नात लक्षणीय वाढ झालेली पहावयास मिळत आहे.

मुंबईत निवडणूक भरारी पथकाला ७२ लाख रुपयांची रक्कम सापडली

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात एका गाडीतून पकडली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे.

आदर्श घोटाळा प्रकरणात अंबादास मानकापे याला सहाव्यांदा अटक !

आदर्श समूहाच्या घोटाळ्यातील ४ प्रमुख आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने ‘आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थे’तील १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.