बांगलादेशही आता पाकिस्तानप्रमाणे झाला भिकेकंगाल !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेश सत्तांतर झाल्यानंतर सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. बांगलादेशाकडे वीज विकत घेण्यासाठी किंवा ऊर्जेशी संबंधित कर्ज फेडण्यासाठी आवश्यक असलेले पैसेही नाहीत. यामुळे येत्या उन्हाळ्यात बांगलादेशाला गंभीर वीज संकटाचा सामना करावा लागू शकतो. यामुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.
१. ‘ढाका ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार ‘बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड (बीपीडीबी)’ विविध स्वतंत्र वीज उत्पादक (आयपीपी) आणि पेट्रोबांगला आस्थापन यांना दिलेले ४३ सहस्र ४७३ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यास असमर्थ आहे. या रकमेचा एक महत्त्वाचा भाग, १० सहस्र ३०९ कोटी रुपये हे भारतीय अदानी समूहाला द्यायचे आहेत. स्थानिक आयपीपींना अनुमाने १६ सहस्र कोटी रुपये मिळणार आहेत आणि ‘पेडा’ आणि ‘रामपाल’ यांसारख्या संयुक्त उपक्रमातील वीज प्रकल्पांवर अनुमाने १० सहस्र कोटी रुपयांचे कर्ज आहे.
२. गेल्या उन्हाळ्यात बांगलादेशाची वीज मागणी १७ सहस्र ५०० मेगावॅटपर्यंत पोचली होती; परंतु सरकार सरासरी १५ सहस्र ५०० मेगावॅटच पुरवू शकले, ज्यामुळे २ सहस्र मेगावॅटची कमतरता निर्माण झाली. येत्या उन्हाळ्यात विजेची मागणी १८ सहस्र २३२ मेगावॅटपर्यंत वाढू शकते.
३. जर सरकारने आयपीपींचे थकित कर्ज फेडले नाही, तर देशाला ३ सहस्र ५०० ते ४ सहस्र मेगावॅट वीज निर्मितीचा तुटवडा भासू शकतो.
संपादकीय भूमिकाबांगलादेश भिकेकंगाल होणार, हे स्पष्टच आहे. त्यासाठी कोणत्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही. हे मुसलमानांना लक्षात येण्याची शक्यता नाही कारण ‘धर्मांधता’ नावाच्या अफूची गोळी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यातच त्यांचा नाश होणार आहे ! |