पुणे येथील भूमी खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक !

पुणे – जीवे मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या सागर दत्तात्रय फडतरे आणि गणेश दत्तात्रय फडतरे या दोघांना अमली पदार्थ अन् खंडणीविरोधी पथकाने २० फेब्रुवारी या दिवशी दुपारी कोंढवा परिसरामध्ये अटक केली आहे. संबंधित तरुणांकडून आणखी काही नागरिकांकडे याच पद्धतीने खंडणी मागितल्याची शक्यता आहे.  त्यामुळे अशा नागरिकांनी पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.