अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण
मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील अमली पदार्थ खटल्यासंदर्भात एन्.सी.बी. (ड्रग्जची तस्करी आणि अमली पदार्थांचा दुरुपयोग यांच्या विरोधात काम करणारा अन् अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याची कार्यवाही करणारा नोडल अन् गोपनीय विभाग) कसून अन्वेषण करत आहे. एन्.सी.बी.ने या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी रात्री २ जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी राहिला फर्निचरवाला आहे. राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झा हिची साहाय्यक (असिस्टंट) होती. एन्.सी.बी.ने गेल्या मासात विविध लोकांकडून २०० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते. अमली पदार्थ प्रकरणी एन्.सी.बी.ने आतापर्यंत ३३ लोकांना अटक केली आहे.
Celebrity manager Rahila Furniturewala and businessman Karan Sajnani accused in connection with a drug case related to Sushant Singh Rajput, have been arrested: Narcotics Control Bureau
— ANI (@ANI) February 5, 2021