देशाची एकता आणि अखंडता यांचे रक्षण करण्यास आमचे सैन्य सक्षम आहे ! – राष्ट्रपती

पुणे येथे ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा १४५ वा दीक्षांत समारंभ !

द्रौपदी मुर्मू

पुणे – आम्ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ या परंपरेचे पालन करतो; परंतु देशाची एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोचवणार्‍या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि सदैव सिद्ध आहे, असा विश्वास राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांनी व्यक्त केला. त्या खडकवासला येथील ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’च्या १४५ व्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या.

‘एन्.डी.ए.’च्या ७५ वर्षांच्या वाटचालीमध्ये प्रथमच मुलींची बटालियन (तुकडी) दीक्षांत संचलनामध्ये सहभागी झाली होती. त्याची नोंद घेत राष्ट्रपतींनी ‘ही घटना ऐतिहासिक’ असल्याचे सांगितले.