(म्हणे) ‘सनातन धर्म म्हणजे एच्.आय.व्ही. आणि कुष्ठरोग !’ – द्रमुकचे खासदार ए. राजा

दलित आणि मागासवर्गीय यांची परंपरागत मते मिळवण्यासाठी द्रमुकचे नेते जाणीवपूर्वक अशा प्रकारची टीका करत आहेत, हे लक्षात घेऊन धर्माभिमानी हिंदूंनी याला संघटितपणे विरोध केला पाहिजे !

(म्हणे) ‘उदयनिधी यांचा धर्म आणि परंपरा यांना दुखावण्याचा हेतू नव्हता !’ – तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन

उदयनिधी यांचा द्रमुक पक्ष हिंदु धर्मविरोधी आहे, त्याची तीच विचारसरणी आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे उदयनिधी यांनी केलेली विधाने सनातन धर्माच्या विरोधातच आहेत, यात कुणालाच दुमत नाही !

(म्‍हणे) ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्‍हणीन !’ – उदयनिधी स्‍टॅलिन

सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्‍यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्‍या लाखो वर्षांच्‍या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्‍टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्‍यांनी जनतेला विस्‍तृतपणे सांगायला पाहिजे !

(म्हणे) ‘डेंग्यू, मलेरिया, कोरोना यांच्याप्रमाणेच सनातन धर्मालाही संपवायचे आहे !’- तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी

तमिळनाडूमध्ये सनातन निर्मूलन परिषद घेतली जाते आणि त्याला राज्याचे मंत्री उपस्थित रहातात, हीच त्यांची धर्मनिरपेक्षता आहे का ?

तमिळनाडूमध्ये भाजपच्या कार्यालयातून ‘भारतमाते’चा पुतळा प्रशासनाने हटवला !

अनुमती न घेतल्याने पुतळा हटवल्याची प्रशासनाची माहिती

(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?

तमिळनाडूचे उर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना अटक केल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले !

कारागृहात जाण्यापासून वाचण्यासाठी अटक करण्यात आलेल्या राजकारण्यांना हमखास होणारा आजार ! अशांवर कारवाई होणे आवश्यक !

हिंदुद्वेषी द्रमुक सरकारचा खाेटारडेपणा जाणा !

आम्ही राज्यात चित्रपटावर बंदी आणलेली नाही. चित्रपटगृहाच्या मालकांनीच प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याने चित्रपट हटवला आहे, असे प्रतिज्ञापत्र तमिळनाडूतील द्रमुक सरकारने ‘द केरल स्टोरी’विषयी सर्वाेच्च न्यायालयात सादर केले.

(म्हणे) ‘प्रेक्षकांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने चित्रपटगृह मालकांनी चित्रपट हटवला !’ – तमिळनाडूतील द्रमुक सरकार

सरकारने म्हटले की, हा चित्रपट १९ मल्टिप्लेक्स चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटावर बंदी आणली असल्याचा कोणताही पुरावा याचिकाकर्त्यांनी सादर केलेला नाही.

देशभरात चित्रपट प्रदर्शित झाला असतांना बंगालमध्ये का नाही ? – सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

हिंदूंच्या देशांत हिंदूंवर होणारे अत्याचार न रोखता हे अत्याचार जगासमोर आणणार्‍या चित्रपटावरच बंदी घालणार्‍या बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि तमिळनाडू सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम् या पक्षांना हिंदूंनी राजकीय धडा शिकवणे आवश्यक !