(म्‍हणे) ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्‍हणीन !’ – उदयनिधी स्‍टॅलिन

सनातन धर्म संपवण्‍याविषयीच्‍या विधानावर द्रमुकचे नेते तथा तमिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्‍टॅलिन ठाम !

उदयनिधी स्‍टॅलिन

चेन्‍नई (तमिळनाडू) – तमिळनाडूचे मुख्‍यमंत्री एम्.के. स्‍टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्‍टॅलिन यांनी सनातन धर्म नष्‍ट करण्‍याविषयी केलेल्‍या विधानावर ते अद्यापही ठाम आहेत. त्‍यांनी म्‍हटले की, पंतप्रधान मोदीही ‘काँग्रेसमुक्‍त भारता’ची चर्चा करतात, म्‍हणजे काँग्रेसवाल्‍यांना मारायचे का ? (जर उदयनिधी यांना वाटते की, एखाद्याला संपवणे म्‍हणजे मारणे, असे होत नाही, तर ते जगभरात जिहादी आतंकवाद जो काही विध्‍वंस करत आहेत, तो ज्‍या धर्मामुळे होत आहे, तो संपवण्‍याविषयी ते का बोलत नाहीत ? – संपादक) भाजपला ‘इंडिया’ आघाडीची भीती वाटते आणि त्‍याची दिशाभूल करण्‍यासाठी ते सर्व बोलत आहेत. द्रमुकचे धोरण ‘एक कूळ, एक देव’ असे आहे. मी पुन्‍हा सांगत आहे की, मी केवळ सनातन धर्मावर टीका केली असून ‘सनातन धर्म संपला पाहिजे’, असे मी सतत म्‍हणीन.

उदयनिधी पुढे म्‍हणाले की, काही लोक बालीशपणे वागत आहेत आणि मी हत्‍याकांडासाठी चिथावणी दिल्‍याचे सांगत आहेत. काही लोक द्रविड विचारसरणी नको असल्‍याविषयी बोलतात. याचा अर्थ द्रमुकच्‍या लोकांनाही मारले पाहिजे का ? सनातन म्‍हणजे काय ? ‘सनातन म्‍हणजे काहीही पालटू नये आणि सर्व शाश्‍वत आहे;’ पण द्रविडांची विचारसरणी पालटायची मागणी केली जाते आणि ‘प्रत्‍येक जण समान असावा’, असे मत मांडले जाते.

संपादकीय भूमिका 

सनातन धर्माने कधीही आतंकवाद करण्‍यास सांगितलेले नाही कि सनातन धर्माच्‍या लाखो वर्षांच्‍या इतिहासात सनातन धर्मीय असे कधी वागले असेही नाही; मग स्‍टॅलिन यांना हा धर्म का संपवावासा वाटतो ?, हे त्‍यांनी जनतेला विस्‍तृतपणे सांगायला पाहिजे !