(म्हणे) ‘समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू करा !’ – द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांची हिंदुद्रोही मागणी !

(द्रमुक म्हणजे द्रविड प्रगती संघ)

द्रमुकचे नेते टी.के.एस्. एलंगोवन

चेन्नई (तमिळनाडू) – समान नागरी कायदा प्रथम हिंदु धर्माला लागू केला पाहिजे, अशी मागणी द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे नेते टी.के.एस्. एलंगोवन यांनी केली. पंतप्रधान मोदी यांनी समान नागरी कायद्याचे समर्थन केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.

एलंगोवन यांनी म्हटले की, अनुसूचित जाती आणि जमाती यांच्यासह प्रत्येक व्यक्तीला देशातील कोणत्याही मंदिरात पूजा करण्याची अनुमती दिली पाहिजे. राज्यघटनेने प्रत्येक धर्माला संरक्षण दिले आहे. त्यामुळे आम्हाला समान नागरी कायदा नको आहे.

संपादकीय भूमिका

  • स्वतःला नास्तिकतावादी मानणार्‍या द्रमुकवाल्यांकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ?
  • उद्या केंद्र सरकारने समान नागरी कायदा बनवला, तरी द्रमुक सरकार त्या कायद्याची कार्यवाही करण्याची शक्यताही अल्प आहे. अशा वेळी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत द्रमुकचे सरकार विसर्जित करून तमिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, असेच राष्ट्राभिमान्यांना वाटते !