उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कर्नाटकचे उदाहरण देऊन देश जिंकल्याचे सांगत आहेत ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कर्नाटकमधील पराभवानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे, ‘‘कर्नाटकात कोणतेच सरकार परत येत नाही. वर्ष २०१८ मध्ये भाजपच्या १०६ जागा निवडून येत ३६ टक्के मत मिळाली होती.

कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ चांगला ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

कर्नाटकात आम्ही हरलो, तरी आमचा निवडून येण्याचा ‘रेट’ (वारंवारता) चांगला आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ मे या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

शरद पवार आणि नैतिकता यांचा संबंध काय ? वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ? – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शरद पवार हे जर भाजपला नैतिकता शिकवत असतील, तर इतिहासात जावे लागेल. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतदादा पाटील यांचे सरकार कसे गेले ?, येथून प्रारंभ होईल.

महाराष्ट्रात शिवसेना-भाजप यांचेच सरकार कायम !

उद्धव ठाकरे यांनी स्वत:हून मुख्यमंत्रीपदाचे त्यागपत्र दिल्यामुळेच राज्यातील सरकार कोसळल्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाला न्यायालयाकडून मान्यता दर्शवण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यमान सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हा तर लोकशाहीचा आणि लोकमताचा विजय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो. लोकशाहीचा आणि लोकमताचा पूर्णपणे विजय झाला आहे, असे मी नमूद करू इच्छितो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता !

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्‍पष्‍ट केले आहे.

‘द केरल स्टोरी’च्या दिग्दर्शकाला नव्हे, तर सडक्या डोक्यातील सडक्या विचारांना फाशी देण्याची वेळ आली आहे ! – देवेंद्र फडणवीस

आव्हाड असे बोलले असतील, तर हे विधान अत्यंत चुकीचे आणि अनधिकृत आहे. हे वक्तव्य पडताळून पाहिले जाईल आणि कारवाई केली जाईल.

देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

अवैध वाळूउपसा केल्‍यास थेट ‘मकोका’ लागणार ! – महसूलमंत्री विखे पाटील

वाळूच्‍या अवैध वाहतुकीस आणि तस्‍करीला आळा घालण्‍यासाठी सरकारने नव्‍या वाळू धोरणाची घोषणा करत थेट ६०० रुपये प्रतिब्रासप्रमाणे वाळू ‘अधिकृत डेपो’वरून विकण्‍याचा निर्णय घेतला आहे.

शरद पवार यांच्या त्यागपत्रावर आता बोलणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे विधान