गोसीखुर्द जलाशय (जिल्‍हा भंडारा) येथे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्र पर्यटन विकास महामंडळाच्‍या माध्‍यमातून भंडारा जिल्‍ह्यातील गोसीखुर्द जलाशय येथे नैसर्गिक विविधता, मोठी बेटे आणि बंदर यांची उपलब्‍धता आहे. त्‍यामुळे हे जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्‍यात येईल, अशी घोषणा मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण !

‘‘छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श ठेवून आम्ही राज्यकारभार करत आहोत. त्यामुळे आम्ही अहमदनगरचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्‍टाचारमुक्‍त व्‍यवस्‍था उभी केली ! – देवेंद्र फडणवीस

युपीएच्‍या (संयुक्‍त पुरोगामी आघाडी) सरकारच्‍या कार्यकाळात जेवढे ऐतिहासिक घोटाळे झाले, तेवढे स्‍वतंत्र भारताच्‍या इतिहासात कधीही झाले नव्‍हते. अशा प्रकारची अवस्‍था देशात पाहिली. नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्‍यानंतर मागच्‍या नऊ वर्षांमध्‍ये अतिशय गतीमान निर्णयप्रक्रिया पाहिली. प्रचंड विकास आपण पाहिला.

सावरकर जयंतीनिमित्त नव्या संसद भवनाचे उद्घाटन केल्यामुळेच काही पक्षांचा उद्घाटनला विरोध ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे महान क्रांतीकारक होते. ते साहित्यिक आणि समाजसुधारकही होते.

पशूवधगृह बंद करण्याच्या अनेक वर्षांच्या मागणीचे निवेदन घेऊन आलेले वृद्ध उपमुख्यमंत्र्यांसमोर कोसळले !

आता तरी त्याची नोंद घेऊन पशूवधगृह बंद करतील का ? राज्यभर सगळीकडे अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांवरच सरकारने काहीतरी कार्यवाही करायला हवी !

महाराष्ट्र पोलीस देशात अग्रेसर  ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र पोलीस ही देशाची शान आहे. नागरिकांना पोलिसांची भीती वाटता कामा नये, तर चांगला अनुभव यावा यासाठी त्यांनी कार्यरत रहावे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ करणार्‍या अधिकोषांवर गुन्हा नोंदवा ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

या वेळी फडणवीस म्हणाले, ‘‘कृषी केंद्राच्या माध्यमातून शेतकर्‍यांना बोगस बियाण्यांचे वाटप केले जाते. खते आणि बियाणे देण्यासाठी आणि अन्य उत्पादने घेण्यासाठी शेतकर्‍यांवर दबाव आणला जातो. अशांवर कडक कारवाई करण्यात यावी.’’

देशात राबवले जाणार महाराष्ट्रातील सौर कृषी योजनेचे ‘मॉडेल’ !

या वेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘‘ऊर्जा विभागाने सौर ऊर्जेवरील वीज जोडण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे. मार्च २०२२ पर्यंतच्या नोंदणीला जोडणी देण्यात आली आहे.”

शेतकर्यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे ! – मुख्यमंत्री

शेतकर्‍यांना दर्जेदार बी-बियाणे आणि खते मिळण्यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

विविध शासकीय योजनांचा जनतेला थेट लाभ देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासन सज्ज !

शासनाच्या योजना आणि उपक्रम यांचा थेट लाभ सर्वसामान्यांना त्वरित मिळावा, हा या अभियानाचा उद्देश आहे. शासनाच्या जवळजवळ दोनशेहून अधिक योजनांचा लाभ या माध्यमातून गरजूंना मिळवून दिला जाणार आहे.