देशभक्तांवर बंदीची मागणी म्हणजे देशद्रोह्यांना साथ ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

बेळगाव येथील प्रचार सभा

श्री. देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

बेळगाव – दलाली आणि मध्यस्थ यांची संपूर्ण यंत्रणा संपवण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. भारताला जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्याचे काम मोदीजींनी केले. जागतिक पातळीवरील भारताची शक्ती निर्माण करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ३७० कलम रहित करून देशाला सुरक्षित करण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. विरोधी पक्षांनी केवळ एकच काम केले, ते म्हणजे त्यांच्या सरकारांनी मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोचू दिल्या नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार नाही, तरीही काँग्रेसचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी भांडत आहेत. बजरंग दलावर बंदी घालायची कुणाच्या बापाची हिंमत नाही. बजरंग दलसारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणे म्हणजे एकप्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते बेळगाव येथे प्रचार सभांसाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देतांना बोलत होते.

बेळगावातील प्रचार सभांमध्ये बोलतांना फडणवीस म्हणाले की,

१. मी स्वत: मराठी भाषिकांच्या मागे उभा आहे आणि आमचा पक्षही ठामपणे उभा आहे.

२. डोक्याला गंध लागले, तर ते पुसायचा अट्टाहास काँग्रेसच्या अध्यक्षांकडून केला जातो.

३. रामाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार्‍यांना त्यांची जागा दाखवण्याची ही वेळ आहे.