महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता !

मुंबई – उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बाहेर पडलेल्या १६ आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयी येत्या २ दिवसांत सर्वाेच्च न्यायालयात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निर्णय ११ मे या दिवशी देऊ, असे स्‍पष्‍ट केले आहे.

ज्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापिठापुढे या प्रकरणाची सुनावणी होत आहे त्यामधील न्यायमूर्ती एम्.आर्. शहा १५ मे या दिवशी निवृत्त होत आहेत. १३ मे या दिवशी शनिवार, तर १४ मे या दिवशी रविवार आहे. त्यामुळे हा निकाल ११ किंवा १२ मे पर्यंत होण्याची शक्यता आहे. एका पक्षातील बहुसंख्य आमदार बाजूला होऊन त्यांना पक्षाची मान्यता देण्याचा दुर्मिळ निर्णय यापूर्वी सर्वाेच्च न्यायालयाने दिला आहे. आमदारांच्या पात्र-अपात्रतेच्या निर्णयावरूनही राज्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.