पोरबंदर (गुजरात) किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त !

समुद्री किनार्‍यावरून ३ सहस्र ३०० किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यांचे मूल्य २ सहस्र कोटी रुपयांहून अधिक असून त्यांची तस्करी करणार्‍या इराणी नौकेतील ५ विदेशी व्यापार्‍यांनाही अटक करण्यात आली आहे.

कॅनडात आतंकवादी, फुटीरतावादी आणि भारतविरोधी घटकांना आश्रय ! – परराष्ट्रमंत्री जयशंकर

कॅनडाचे म्हणणे आहे की, लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असे असले, तरी याचा अर्थ ‘मुत्सद्दींना धमकावले पाहिजे’ असा नाही.

कर्करोगावरील उपचारांमध्ये भारतीय मसाले प्रभावी ! – ‘आयआयटी मद्रास’चे संशोधन

भोजन हा कोणत्याही संस्कृतीचा एक अविभाज्य घटक ! भारतीय अन्न पदार्थ पौष्टिक आणि सात्त्विक असल्याचे सर्वांना ठाऊक आहेच. त्याचे अनेक औषधी लाभही आहेत, जे काही वेळा आधुनिक वैद्यकशास्त्रातील उपचारांपेक्षाही सरस आहेत.

SIMI Terrorist Arrested : २२ वर्षे पसार असणारा सिमीचा आतंकवादी अटकेत !

तो सिमीच्या मासिकाचा संपादकही होता. हनीफ शेख वर्ष २००२ पासून पसार होता. तो भुसावळ येथे स्वतःची ओळख लपवून रहात होता. येथे एका उर्दू शाळेत शिक्षक झाला होता.

३ नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार !

१ जुलै २०२४ पासून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष्य अधिनियम हे कायदे लागू होणार आहेत.

२ सहस्र कोटी रुपयांची अमली पदर्थांची तस्करी करणारी आंतरराष्ट्रीय टोळी उद्ध्वस्त !

अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि देहली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे.

इस्रो मंगळावर ‘लँडर’द्वारे ‘हेलिकॉप्टर’ पाठवण्याच्या सिद्धतेत !

भारताच्या पुढील मंगळ ग्रह मोहिमेत हेलिकॉप्टरचाही समावेश असू शकतो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत आहे. मंगळावर ‘लँडर’द्वारे ‘हेलिकॉप्टर’ पाठवण्याची इस्रोची योजना आहे.

सिमी प्रकरणातील फरार आरोपीला भुसावळमधून अटक !

देहली येथे वर्ष २००१ मध्ये प्रविष्ट झालेल्या  (वय ४७ वर्षे) याला देहलीच्या पोलिसांनी भुसावळमधून अटक केली आहे.

शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘एक्स’ खाती बंद करण्याचा केंद्र सरकारचा आदेश !

आंदोलनाची माहिती देणारी ‘एक्स’वरील खाती बंद करण्याचा आदेश केंद्र सरकारने ‘एक्स’ आस्थापनाला दिला. शासकीय आदेश असल्यामुळे ‘एक्स’ने संबंधित खाती आणि पोस्ट नाईलाजास्तव हटविल्या आहेत.

Mediator Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वाद सोडवण्यासाठी भारत मध्यस्थी करण्यास सिद्ध ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.