देहली पोलिसांची कारवाई !
भुसावळ – देहली येथे वर्ष २००१ मध्ये प्रविष्ट झालेल्या (वय ४७ वर्षे) याला देहलीच्या पोलिसांनी भुसावळमधून अटक केली आहे. त्याला अतिरिक्त सत्र न्यायालयात उपस्थित केले असता त्याला २ दिवसांचा ट्रान्झिट रिमांड (आरोपीला एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी नेण्यासाठी पोलिसांनी मागितलेली पोलीस कोठडी) देण्यात आला आहे.
तो एका उर्दू शाळेत शिक्षक आहे. वर्ष २००१ मध्ये प्रतिबंधित आतंकवादी संघटना ‘सिमी’च्या ‘इस्लामिक मूव्हमेंट’ या मासिकामध्ये प्रक्षोभक लिखाण केल्याच्या गुन्ह्यात हानिफवर आरोप होते.