Mediator Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमधील वाद सोडवण्यासाठी भारत मध्यस्थी करण्यास सिद्ध ! –  परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – आवश्यकता भासल्यास रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद सोडवण्यासाठी भारत मध्यस्थाची भूमिका बजावण्यास सिद्ध असल्याचे संकेत परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी दिले. या प्रकरणी भारत स्वत:हून कोणतेही पाऊल उचलणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका जर्मन वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत एस्. जयशंकर यांनी हे भाष्य केले.

जयशंकर पुढे म्हणाले की, भारत युक्रेन युद्ध संपवण्यासाठी कटीबद्ध आहे. प्रत्येक जण या संघर्षामुळे चिंतेत आहे.

(सौजन्य : DNAIndiaNews)

ते पुढे म्हणाले की, इतिहास पहाता, रशियाने कधीही भारताच्या हितसंबंधांना हानी पोचवली नाही. भारताने रशियासोबतचे आर्थिक संबंध वाढवले आहेत. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध स्थिर आणि मैत्रीपूर्ण आहेत.