मागण्यांची पूर्तता होईपर्यंत उपोषण चालूच ठेवणार ! – ह.भ.प. भगवान महाराज कोकरे

सरकारने लोटे येथील ‘श्री संत ज्ञानेश्‍वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवा संस्थान गोशाळे’ला उर्वरित अनुदान द्यावे, तसेच गोशाळेच्या जागेचा प्रश्‍न सोडवावा, या मागण्यांची पूर्तता जोपर्यंत केली जात नाही, तोपर्यंत मी उपोषण चालूच ठेवणार आहे.

लोटे (खेड) येथे ह.भ.प. भगवान कोकरे महाराज पोलिसांच्या कह्यात !

सरकारने ह.भ.प. कोकरे महाराज यांच्या उपोषणाची दखल न घेतल्याने त्यांचे उपोषण चालूच आहे. आम्ही गायींसाठी आंदोलन करत आहोत. सरकार हिंदुत्वनिष्ठ असेल, तर त्यांनी या उपोषणाची दखल घ्यावी.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरने चारचाकी वाहनावर लावला गोमयाचा लेप !

वाहनाच्या बाहेर शेण लावल्याने आत उष्णता जात नाही. यामुळे वाहन आतून थंड रहाते, असे तज्ञांचेही म्हणणे आहे.

‘द इंडियन व्हेटर्निअरी रिसर्च इन्स्टिट्यूट’(आय.व्ही.आर्.आय.)ने केलेले गोमूत्र संशोधन दिशाभूल करणारे !

हिंदूंना पूजनीय असलेल्या गायीविषयी दिशाभूल करणारे संशोधन हिंदूबहुल भारतात होणे, हे हिंदूंना लज्जास्पद !

लोटे येथे ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांच्या उपोषणाच्या कालावधीत गोशाळेतील ६ गायींचा मृत्यू

गायींच्या चार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे या गोशाळेतील गायींवर उपासमारीची वेळ आली आहे. गोशाळेचे रखडलेले अनुदान मिळावे, गोशाळेसाठी एम्.आय.डी.सी. विभागाकडून भाडेतत्त्वावर भूमी मिळावी, हे उपोषण चालू आहे.

लोटे (खेड) येथील गोशाळेच्या जागेचा प्रश्न न सुटल्याने ह.भ.प. भगवान कोकरे महाराज यांचे आमरण उपोषण  

गोशाळेत सध्या ११०० गायी आहेत. त्यांच्या वैरणीचा प्रश्नही निर्माण झाला आहे. कीर्तनसेवेतून या गायींची सेवा केली जाते; मात्र त्यांचा दिवसाचा खर्च अनुमाने ६० सहस्र रुपये येतो. त्यामुळे हा खर्च परवडत नाही.

‘प्रोजेक्ट काऊ’ कधी ?

गोवंशियांचे रक्षण व्हावे, हीच खरी तळमळ असणे आवश्यक आहे. ती निर्माण करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. ही स्थिती पहाता भगवान श्रीकृष्णाप्रमाणे गोरक्षण करणारे शासनकर्ते देशाला आवश्यक आहेत, असेच म्हणावे लागेल !

गोमातेला ‘राष्ट्रीय पशू’चा दर्जा मिळण्यासाठी विविध उच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींचे प्रयत्न !

काँग्रेसने इंग्रजांच्या प्रथा पाळण्यात धन्यता मानली. तिने हिंदूंच्या रामसेतू, गोमाता, गंगा, तसेच १२ ज्योतिर्लिंगे आणि चारधाम अशा वैभवांना काहीही महत्त्व दिले नाही. त्यांचा विकास करण्याऐवजी त्यांनी मोठमोठी मंदिरे अधिग्रहित करून त्यांचे धन लुबाडले.

कर्जत (रायगड) येथे आढळली १०० हून अधिक गोवंशियांची कातडी !

कर्जत तालुक्यातील नेरळ-ममदापूर-धामद ग्रामपंचायत क्षेत्रातील एका पठारावर हत्या केलेल्या गोवंशियांची फेकून दिलेली कातडी आढळली आहे. या कातड्यांची संख्या १०० हून अधिक आहे. येथील ‘महाराष्ट्र न्यूज २४’ या स्थानिक वेबपोर्टलवर व्हिडिओसह याविषयीचे वृत्त प्रसारित करण्यात आले आहे.

कुख्यात गुंड आतिक अहमद याला पोलिसांनी गुजरातमधून प्रयागराजमध्ये आणले !

उत्तरप्रदेशातील कुख्यात गुंड आतिक अहमद हा गुजरातच्या साबरमती कारागृहात अटकेत होता. त्याला अधिवक्ता उमेश पाल यांच्या हत्येच्या प्रकरणी कह्यात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांकडून प्रयागराज येथे आणण्यात आले.