कन्नड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील प्रकारगोवंशियांची हत्या करून मांसाची वैजापूर, चाळीसगाव परिसरात विक्री !मासाभरापूर्वी नागरिकांनी पोलिसांकडे केली होती तक्रार ! |
कन्नड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) – शहरातील बारामती ॲग्रो साखर कारखान्याच्या पाठीमागे, धुळे-सोलापूर महामार्गावर असलेल्या जिओ पेट्रोल पंपाच्या समोरील गट क्रमांक १७८ मधील निवासी प्लॉटिंगमध्ये गेल्या काही दिवसांपासून उघडपणे अवैध गोवंशियांची कत्तल केली जात आहे. महाराष्ट्रात गोवंशहत्या बंदी कायदा लागू असतांनाही हा प्रकार चालू आहे. प्रतिदिन जवळपास ३० ते ४० गोवंशीय जनावरांची उघडपणे कत्तल होत असल्याचा अंदाज या ठिकाणी दिसून आलेल्या जनावरांच्या शिगांवरून व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, चाळीसगाव, मालेगाव या ठिकाणी गोमांसाची विक्री आणि वाहतूक केली जात आहे, तसेच मासाभरापूर्वी नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार केल्याचे येथील नागरिकांनी सांगितले.
खड्डा खोदून अवशेषांची लावली जाते विल्हेवाट !
कन्नड शहरानजीक बारामती ॲग्रो कारखान्याच्या परिसरातील गट क्रमांक १७८ मध्ये २० फुटांचा रस्ता आहे. या रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जनावरांची कत्तल केल्यानंतरचे रक्त आणि अन्य काही निरुपयोगी अवयवांची विल्हेवाट लावली जात असून उघडपणे गोवंशहत्या कायद्याचा भंग केला जात आहे. या प्रकाराचा ‘व्हिडिओ’ दिवसभर ‘व्हायरल’ झाला आहे.
संपादकीय भूमिकाराजरोजपणे गोवंशियांची हत्या होत असूनही प्रशासनाकडून कठोर कारवाई न होणे, हे संतापजनक ! गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कारवाई होण्यासाठी हिंदूंनीच संघटितपणे प्रयत्न करणे आवश्यक ! गोवंशियांची उघडपणे कत्तल होणे, यावरून गोतस्कर गोवंश हत्याबंदी कायद्याला जुमानत नसल्याचे लक्षण ! |