लोणंद (सातारा) येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर गुन्हा नोंद !

(प्रतिकात्मक चित्र)

सातारा, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – फलटण तालुक्यातील बिबी येथे गोमांसाची वाहतूक करणार्‍या ३ जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

फलटण येथील कुरेशीनगरमधील मुबारक हनीफ कुरेशी यांनी विक्रीसाठी काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये गाय आणि बैल यांच्या मांसाचे तुकडे गाडीत भरले होते. या गाडीचे मालक सलमान कुरेशी असून त्यांच्याच सांगण्यावरून महादेव कुंभार ही गाडी घेऊन जात होते. बिबी गावाच्या सीमेत फलटण-सातारा रस्त्यावर होणारी गोमांसाची वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यामुळे सलमान कुरेशी, हनीफ कुरेशी आणि महादेव कुंभार या ३ जणांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यातील २ जणांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संपादकीय भूमिका

महाराष्ट्रात लागू असलेला गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करून गोमांसाची वाहतूक आणि गोवंशियांच्या हत्या पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता आहे !