फलटण (जिल्हा सातारा) – बरड मार्केटयार्ड येथून २० नोव्हेंबर या दिवशी गोवंशियांना कत्तलीसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार शिवराज निगडे आणि शरद गाडे यांनी फलटणच्या दिशेने निघालेला टेंपो अडवून त्याची पहाणी केली. त्यात ३५ ते ४० म्हशींची रेडके आढळली. चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीकडे विचारपूस करत असतांना फलटण बाजूकडून १ चारचाकी आली. त्यामधून चौघेजण खाली उतरल्यानंतर चालकाशेजारी बसलेल्या व्यक्तीने शिवराज निगडे यांना फलटण-पंढरपुररोडवरून खाली ढकलत नेऊन ‘आमच्याकडे गुरे वाहतुकीची अनुमती आहे. तुम्ही आमची गाडी का अडवली ?’, असे म्हणून लहान चाकूने निगडे यांच्या डाव्या हाताच्या पोटरीवर एक वार केला. त्यानंतर सगळेजण फलटणच्या दिशेने पसार झाले.
संपादकीय भूमिकागोमातेसह गोरक्षक संकटात आणि गोहत्या करणारे मोकाट असल्याने गोहत्या थांबत नाहीत. त्यासाठी कायद्याची कार्यवाही करणारे प्रशासन प्रामाणिक हवे. |