कर्नाटकमधील धर्मादाय विभागाचा मंदिरांना आदेश !

बेंगळुरू (कर्नाटक) – राज्याच्या धर्मादाय विभागाने त्याच्या अंतर्गत येणार्या सर्व मंदिरांना दिवाळीनिमित्त १४ नोव्हेंबर या दिवशी गोपूजा करण्याचा आदेश दिला आहे. या दिवशी गायींना स्नान घालून मंदिरात आणून त्यांची पूजा करण्यास सांगितले आहे. गायीला हळद, कुंकू लावण्यास, फुलांद्वारे सजवण्यास, तसेच गायीला गोड पदार्थ खाऊ घालण्यास सांगितले आहे. सायंकाळी ५.३० ते ६.३० या वेळेत गोपूजा करण्यास सांगण्यात आले आहे.
धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे अविभाज्य अंग असलेल्या गायींचे महत्त्व अन् संरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी मंदिरांमध्ये गोपूजेचे आयोजन करण्यात आल्याचे धर्मादाय विभागाने स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकागोपूजा करण्याचा आदेश देणार्या कर्नाटकातील काँग्रेस सरकारने गोहत्या होणार नाही, याकडेही तितकेच लक्ष द्यावे ! |
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)
CJP Social Media : सीजेपी आंदोलनातील सामाजिक माध्यमांच्या ५०० हून अधिक विदेशी खात्यांवर कारवाई चालू ! – महाराष्ट्र सायबर पोलीस
Gadchiroli Maoist Posters: गडचिरोलीत माओवाद्यांचे फलक आणि पत्रके आढळली !
शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणे, हा नागरिकांना राज्यघटनेने दिलेला मूलभूत अधिकार ! – Supreme Court