वसुबारसनिमित्त कोल्‍हापूर येथील गोरक्षनाथ मठात गोपूजन आणि होम !

गोरक्षनाथ मठ येथे होमासाठी उपस्‍थित विविध गोरक्षक

कोल्‍हापूर – वसुबारस या दिवशी शिवाजी पेठ येथील गोरक्षनाथ मठ येथे गोपूजन आणि होम यांचे आयोजन करण्‍यात आले होते. सर्वप्रथम गणेश पूजन करून गोपूजा करण्‍यात आली. त्‍यानंतर क्षेत्रदेवतेची स्‍थापना करून त्‍यांचा आशीर्वाद घेऊन उपस्‍थित सर्वांनी पंचगव्‍य प्राशन केले. यानंतर ३ घंटे हवन करण्‍यात आले. यात गोवर्‍या आणि गायीचे तूप वापरण्‍यात आले. गोरक्षकांना गोरक्षणाचे कार्य करतांना बळ मिळण्‍यासाठी हा होम करण्‍यात आला.

गोपूजन करताना उपस्‍थित भाविक

होमाची संकल्‍पना सांगली येथील ‘अखिल भारत कृषी गोसेवा संघा’चे श्री. अंकुश गोडसे यांची होती. निमशिरगाव येथील ‘वेद खिल्लार गोशाळे’चे श्री. नितेश ओझा यांच्‍या हस्‍ते पूजा करण्‍यात आली. ‘सेवाव्रत प्रतिष्‍ठान’चे श्री. संभाजी साळुंखे यांच्‍या हस्‍ते गोपूजन करण्‍यात आले. या प्रसंगी श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे धारकरी श्री. अमोल कुलकर्णी, ‘गोकुळ नंदन गोशाळे’चे श्री. नितेश जाधव, सर्वश्री यज्ञेश सावंत, अवधूत यादव, सिद्धार्थ कटकधोंड, तुकाराम मांडवकर, विश्‍व हिंदु परिषदेचे श्री. लिंबांनी यांसह परिसरातील गोभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते.

‘नदीवेस गणपति चॅरिटेबल ट्रस्‍ट’च्‍या वतीने आयोजित गोपूजनासाठी उपस्‍थित भाविक

मिरज येथे विविध ठिकाणी गोवत्‍स पूजन !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने वीर सावरकर चौक येथे आयोजित गोपूजनासाठी उपस्‍थित भाविक

मिरज – येथे विविध संघटनांच्‍या वतीने गोवत्‍स पूजन करण्‍यात आले. श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने वीर सावरकर चौक येथे, संभा तालीम चौक, श्री शिवतीर्थ आणि अन्‍य अनेक ठिकाणी गोपूजन करण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने महिला उपस्‍थित होत्‍या. ‘नदीवेस गणपति चॅरिटेबल ट्रस्‍ट’ आणि बजरंग दल यांच्‍या वतीने यंदा सलग सातव्‍या वर्षी गोवत्‍स पूजन अन् महाआरती करण्‍यात आली. या वेळी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची वंदनीय उपस्‍थिती होती.

या प्रसंगी राष्‍ट्रवादी काँग्रेसचे श्री. बाळासाहेब होनमोरे, शिवसेनेचे श्री. आनंद राजपूत, बजरंग दलाचे सांगली जिल्‍हा संयोजक श्री. आकाश जाधव, श्री. संजय मोतुगडे, श्री. विशाल घोरपडे, अधिवक्‍ता सी.ए. पाटील, तसेच विविध गोप्रेमी उपस्‍थित होते. येथे गोवत्‍स पूजनाची माहिती देणारा फलक लावण्‍यात आला होता.